Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 30

45 Mantra
27/30
Devata- वायुर्देवता Rishi- पुरुमीढ ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
वायो॑ शु॒क्रोऽ अ॑यामि ते॒ मध्वो॒ऽअग्रं॒ दिवि॑ष्टिषु। आ या॑हि॒ सोम॑पीतये स्पा॒र्हो दे॑व नि॒युत्व॑ता॥३०॥

वायो॒ऽइति॒ वायो॑। शु॒क्रः। अ॒या॒मि॒। ते॒। मध्वः॑। अग्र॑म्। दिवि॑ष्टिषु। आ। या॒हि॒। सोम॑ऽपीतय॒ इति॒ सोम॑पीतये। स्पा॒र्हः। दे॒व॒। नि॒युत्व॑ता ॥३० ॥

Mantra without Swara
वायो शुक्रोऽअयामि ते मध्वोऽअग्रंदिविष्टिषु । आ याहि सोमपीतये स्पार्हा देव नियुत्वता ॥

वायोऽइति वायो। शुक्रः। अयामि। ते। मध्वः। अग्रम्। दिविष्टिषु। आ। याहि। सोमऽपीतय इति सोमपीतये। स्पार्हः। देव। नियुत्वता॥३०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (वायो) वायू प्रमाणे (जीवनाची शुद्धी करणारे) हे विद्वान, (शुक्रः) आपण शुद्धिकारक आहात (ते) आपल्या (मध्वः) मधुर वचनातील जे (अग्रम्) उत्तम विचार आहेत, त्या विचारांप्रमाणे मी (दिविष्टिषु) उत्तम सभा-संगती आदीमधे (अयामि) प्राप्त होतो (त्या विचारांची चर्चा करतो व तदनुसार आचरण करतो) हे (देव) उत्तम गुणसंपन्न विद्वान, (स्पार्हः) उत्तम गुणांची अभिलाषा करणार्‍या पित्याचे आपण पुत्र आहात. (नियुत्वता) वायूसह (सोमपीतय) औषधीचे रस पिण्याकरिता (आ, याहि) उत्तमप्रकारे इथे या (आम्हा गृहस्थजनांच्या स्वागताचा स्वीकार करा) ॥30॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यांनो, वायू जसा सर्व रसाचे आणि गंधाचे प्राशन करून सर्वांना पुष्टी देतो, तद्वत तुम्हीही इतरांना पोषण वा वृद्धी द्या ॥30॥
Subject
मनुष्याने काय केले पाहिजे, या विषयी -