Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 3

45 Mantra
27/3
Devata- अग्निर्देवता Rishi- अग्निर्ऋषिः Chhand- विराट् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
त्वाम॑ग्ने वृणते ब्राह्म॒णाऽ इ॒मे शि॒वोऽ अ॑ग्ने सं॒वर॑णे भवा नः।स॒प॒त्न॒हा नो॑ अभिमाति॒जिच्च॒ स्वे गये॑ जागृ॒ह्यप्र॑युच्छन्॥३॥

त्वाम्। अ॒ग्ने॒। वृ॒ण॒ते॒। ब्रा॒ह्म॒णाः। इ॒मे। शि॒वः। अ॒ग्ने॒। सं॒वर॑ण॒ इति॑ सं॒ऽवर॑णे। भ॒व॒। नः॒ ॥ स॒प॒त्न॒हेति॑ सपत्न॒ऽहा। नः॒। अ॒भि॒मा॒ति॒जिदित्य॑भिमाति॒ऽजित्। च॒। स्वे। गये॑। जा॒गृहि॒। अप्र॑युच्छ॒न्नित्यप्र॑ऽयुच्छन् ॥३ ॥

Mantra without Swara
त्वामग्ने वृणते ब्राह्मणाऽइमे शिवोऽअग्ने सँवरणे भवा नः । सपत्नहा नोऽअभिमातिजिच्च स्वे गय जागृह्यप्रयुच्छन् ॥

त्वाम्। अग्ने। वृणते। ब्राह्मणाः। इमे। शिवः। अग्ने। संवरण इति संऽवरणे। भव। नः॥ सपत्नहेति सपत्नऽहा। नः। अभिमातिजिदित्यभिमातिऽजित्। च। स्वे। गये। जागृहि। अप्रयुच्छन्नित्यप्रऽयुच्छन्॥३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) तेजस्वी विद्वान, अग्नीप्रमाणे तेजस्वी असलेले (इमे) हे जे (ब्राह्मणाः) ब्रह्मवेत्ताजन (त्वाम्) आपणाला (वृणते) आपला (प्रमुख ब्रह्मवेक्ता) मानतात, (त्यांनी दिलेले हे बहुमान) (संवरणे) स्वीकारण्यात आपण (शिवः) कल्याणकारी (भव) व्हा. (प्रमुखत्व मान्य करा) आणि (नः) आमच्या (सपत्नहा) शत्रूच्या दोषांचे नाश करणारे व्हा. हे (अग्ने) अग्नीप्रमाणे तेजोमय विद्वान, आपण (अप्रयुच्छन्) प्रमाद न करता (च) आणि (अभिमातिजित्) अभिमानावर विजय मिळविलेले आपण (त्ये) स्वतःच्या (गये) घरात (जागृहि) जागृत रहा म्हणजे गृहकार्यें करण्यात सावध व तत्पर रहा, निद्रा वा आलस्य यामधे वेळ वाया घालवू नका. (नः) आणि आम्हा (जिज्ञासू प्रजाजनांना) देखील चैतन्यमय ठेवा. ॥3॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे विद्वज्जन ब्रह्माचा स्वीकार करून आनंद-मंगल प्राप्त करतात आणि दोषांना निर्मूळ करतात त्याप्रमाणे जिज्ञासूजनांनी ब्रह्मवेत्ताजनांजवळ जाऊन स्वतः आनंद-मंगल साजरे करावे, स्वच्छ आचरण ठेवावे, दुष्ट स्वभाव-प्रवृत्तींचा त्याग करावा आणि आळस त्यागून विद्येविषयी उन्नती साधावी ॥3॥
Subject
जिज्ञासूजनांनी काय करावे, याविषयी -