Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 2

45 Mantra
27/2
Devata- समिधन्यो देवताः Rishi- अग्निर्ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
सं चे॒ध्यस्वा॑ग्ने॒ प्र च॑ बोधयैन॒मुच्च॑ तिष्ठ मह॒ते सौभ॑गाय।मा च॑ रिषदुपस॒त्ता ते॑ऽ अग्ने ब्र॒ह्माण॑स्ते य॒शसः॑ सन्तु॒ माऽन्ये॥२॥

सम्। च॒। इ॒ध्यस्व॑। अ॒ग्ने॒। प्र। च॒। बो॒ध॒य॒। ए॒न॒म्। उत्। च॒। ति॒ष्ठ॒। म॒ह॒ते। सौभ॑गाय ॥ मा। च॒। रि॒ष॒त्। उ॒प॒स॒त्तेत्यु॑पऽस॒त्ता। ते॒। अ॒ग्ने॒। ब्र॒ह्माणः॑। ते॒। य॒शसः॑। स॒न्तु॒। मा। अ॒न्ये ॥२ ॥

Mantra without Swara
सञ्चेध्यस्वाग्ने प्र च बोधयैनमुच्च तिष्ठ महते सौभगाय । मा च रिषदुपसत्ता तेऽअग्ने ब्रह्माणस्ते यशसः सन्तु मान्ये ॥

सम्। च। इध्यस्व। अग्ने। प्र। च। बोधय। एनम्। उत्। च। तिष्ठ। महते। सौभगाय॥ मा। च। रिषत्। उपसत्तेत्युपऽसत्ता। ते। अग्ने। ब्रह्माणः। ते। यशसः। सन्तु। मा। अन्ये॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अग्ने) अग्निवत तेजस्वी विद्वान, आप (सम्, इध्यस्व) चांगल्याप्रकारे एक सदाचारी, सच्छील व्यक्ती म्हणून) प्रसिद्ध व्हा. (च) आणि (एनम्) या जिज्ञासू मनुष्याला (की) आपले काही प्रश्‍न वा अडचणी घेऊन आपल्याकडे आला आहे, त्याला) चांगल्या प्रकारे (बोधय) समजून सांगा, उत्साहित करा. (च) आणि (महते) (सौभगाय) अधिक मोठ्या सौभाग्यासाठी (याहून अधिक मोठ्या आव्हानासाठी) (उत्, तिष्ठ) सन्नद्ध व्हा) (उपसत्ता) आपण आमच्याजवळ बसणारे आहात, त्यामुळे आमचे व आपले सौभाग्य (मा, रिषत्) बिघडू देऊ नका. हे (अग्ने) तेजस्वी मनुष्य, (ते) आपले जे (ब्राह्मणः) चार वेद जाणणारे पंडितगण आहेत, ते (अन्ये) भिन्न विचारांचे (च) देखील (मा, सन्तु) होऊ नयेत. (वेदवेत्ताजन राजा वा राजपुरूषांच्या मतास अनुकूल असावेत) (ते) आपण स्वतःही (यशसः) आपली कीर्ती विकृत होऊ देऊ नका. ॥2॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे लोक वा राजा अविद्वान लोकांना उत्तम अधिकारपदांवर नेमत नाहीत म्हणजे चांगल्या उच्च पदावर उत्तम विद्वान व्यक्तीनांच नेमतात, नेहमी राज्याच्या उन्नतीसाठी झटतात आणि कोणालाही अन्यायाने मारणे, हानी करणे वा संपविणे कदापि करत नाहीत, ते कीर्तीमंत आणि ऐश्‍वर्यवंत होतात. ॥2॥
Subject
missing