Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 19

45 Mantra
27/19
Devata- इडादयो लिङ्गोक्ता देवताः Rishi- अग्निर्ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
ति॒स्रो दे॒वीर्ब॒र्हिरेदꣳ स॑द॒न्त्विडा॒ सर॑स्वती॒ भार॑ती। म॒ही गृ॑णा॒ना॥१९॥

ति॒स्रः। दे॒वीः। ब॒र्हिः। आ। इ॒दम्। स॒द॒न्तु॒। इडा॑। सर॑स्वती। भार॑ती। म॒ही। गृ॒णा॒ना ॥१९ ॥

Mantra without Swara
तिस्रो देवीर्बर्हिरिदँ सदन्त्विडा सरस्वती भारती । मही गृणाना ॥

तिस्रः। देवीः। बर्हिः। आ। इदम्। सदन्तु। इडा। सरस्वती। भारती। मही। गृणाना॥१९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (मही) महान (गृणाना) स्तुती करणारी (इडा) स्तवनीय (जिची स्तुती करावी अशी)(सरस्वती) प्रभूत ज्ञानदंपन्न आणि (भारती) सर्वशास्त्र जिच्यात अंतर्भूत आहेत, अशी जी (तिस्रः) तीन प्रकारची (देवीः) कमनीय वाणी (इदम्) या (बर्हिः) अंतरिक्षात (आकाशात) (आ, सदन्तु) सर्वतः) प्राप्त व्हावी (आकाशात प्रिय), स्तुत्य आणि ज्ञानसंपन्न वाणी भरून राहो.) हे मनुष्यांनो, तुम्ही त्या तीन प्रकारच्या वाणीला जाणून घ्या (आणि मधुर भाषी व्हा) ॥19॥
Essence
भावार्थ - जे लोक लौकिक व्यवहारात चतुर, सर्व शास्त्रविद्या युक्त आणि सत्य आदी गुण धारण करणारी या तीन प्रकारच्या वाणीचा उपयोग करतात, ते स्तुतीस पात्र असतात आणि महान पुरूष होतात. ॥19॥
Subject
मनुष्यांची वाणी (भाषा वा बोलणे) कशी असावी, -