Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 15

45 Mantra
27/15
Devata- वायुर्देवता Rishi- अग्निर्ऋषिः Chhand- स्वराडुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
स य॑क्षदस्य महि॒मान॑म॒ग्नेः सऽर्इं॑ म॒न्द्रा सु॑प्र॒यसः॑।वसु॒श्चेति॑ष्ठो वसु॒धात॑मश्च॥१५॥

सः। य॒क्ष॒त्। अ॒स्य॒। म॒हि॒मान॑म्। अ॒ग्नेः। सः। ई॒म्। म॒न्द्रा। सु॒प्र॒यस॒ इति॑ सुऽप्र॒यसः॑। वसुः॑। चेति॑ष्ठः। व॒सु॒धात॑म॒ इति॑ वसु॒ऽधात॑मः। च॒ ॥१५ ॥

Mantra without Swara
स यक्षदस्य महिमानमग्नेः सऽईम्मन्द्रा सुप्रयसः । वसुश्वेतिष्ठो वसुधातमश्च ॥

सः। यक्षत्। अस्य। महिमानम्। अग्नेः। सः। ईम्। मन्द्रा। सुप्रयस इति सुऽप्रयसः। वसुः। चेतिष्ठः। वसुधातम इति वसुऽधातमः। च॥१५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (सः) तो पूर्व मंत्रात वर्णित विद्वान (सुप्रयसः) सुंदर प्रिय अन्नादीच्या प्राप्तीसाठी (अस्य) या (अग्नेः) अग्नीच्या (महिमानम्) मोठेपणाला (त्यापासून मिळणार्‍या लाभासाठी) (यक्षत्) सम्यक प्रकारे प्राप्त करो (त्याचे यत्न यशस्वी व्हावेत, अशी आमची कामना आहे) तसेच (सः) तो विद्वान (वसुः) निवासाचे कारण (घर आदीच्या निर्माणाचे तंत्र (चेतिष्ठाः) पूर्णपणे जाणणारा (च) आणि (वसुधातमः) अत्यंत धनसंपत्ती बाळगणारा होऊन (ईम्) जल आणि (मन्द्रा) आनंदकर हवनीय पदार्थ प्राप्त करणारा होवो (अशी आमची कामना आहे. आपल्या ज्ञान प्राप्तीत तो यशस्वी झाला, तर जल, अग्नी, वायू आदीचे लाभ आम्हालाही मिळू शकतील) ॥15॥
Essence
भावार्थ - जो माणूस अग्नीचे मोठेपण वा महत्व पूर्णपणे जाणतो, तो अत्यंत धनवान होतो. ॥15॥
Subject
पुन्हा, त्याच विषयी -