Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 14

45 Mantra
27/14
Devata- वह्निर्देवता Rishi- अग्निर्ऋषिः Chhand- भुरिगुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
अच्छा॒यमे॑ति॒ शव॑सा घृ॒तेने॑डा॒नो वह्नि॒र्नम॑सा। अ॒ग्नि स्रुचो॑ऽ अध्व॒रेषु॑ प्र॒यत्सु॑॥१४॥

अच्छ॑। अ॒यम्। ए॒ति॒। शव॑सा। घृ॒तेन॑। ई॒डा॒नः। वह्निः। नम॑सा। अ॒ग्निम्। स्रुचः॑। अ॒ध्व॒रेषु॑। प्र॒यत्स्विति॑ प्र॒यत्ऽसु॑ ॥१४ ॥

Mantra without Swara
अच्छायमेति शवसा घृतेनेडानो वह्निर्नमसा । अग्निँ स्रुचो अध्वरेषु प्रयत्सु ॥

अच्छ। अयम्। एति। शवसा। घृतेन। ईडानः। वह्निः। नमसा। अग्निम्। स्रुचः। अध्वरेषु। प्रयत्स्विति प्रयत्ऽसु॥१४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (अयम्) हा जो (ईडानः) स्तुती केल्यानंतर प्राप्त होणारा (वह्निः) विद्या दूरपर्यंत नेणारा (ज्ञानाचा प्रसार करणारा) विद्वान आहे, तो (प्रयत्सु) प्रयत्नाने साध्य आशा सर्व कार्यात तसेच (अध्वरेषु) ज्यात हिंसा केली जात नाही, अशा यज्ञात (सवसा) आपल्या पूर्ण शक्तीनिशी यत्न करतो, तसेच (घृतन) जलाने आणि तसेच (स्रुचः) होमाची साधने आदी घेऊन (अच्छ, एति) चांगल्या भावनेने (यज्ञाच्या वेळी) येतो, तुम्ही त्या विद्वानाचा सत्कार-सम्मान करा. ॥14॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यानो, जो अग्नी इंधन (तेल) आणि पाणी यांच्या साहाय्याने चालणार्‍या यान (इंधन, विमान आदींना) वेगाने शक्तीने चालवतो, त्याच्या विषयी अधिक ज्ञान मिळवून अधिक लाभ मिळवा. ॥14॥
Subject
अग्नीद्वारे काय लाभ प्राप्त करावेत, याविषयी -