Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 27 / Mantra 12

45 Mantra
27/12
Devata- विश्वेदेवा देवताः Rishi- अग्निर्ऋषिः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
तनू॒नपा॒दसु॑रो वि॒श्ववे॑दा दे॒वो दे॒वेषु॑ दे॒वः।प॒थो अ॑नक्तु॒ मध्वा॑ घृ॒तेन॑॥१२॥

तनू॒नपा॒दिति॒ तनू॒ऽनपा॑त्। असु॑रः। वि॒श्ववे॑दा॒ इति॑ वि॒श्वऽवे॑दाः। दे॒वः। दे॒वेषु॑। दे॒वः। प॒थः। अ॒न॒क्तु॒। मध्वा॑। घृ॒तेन॑ ॥१२ ॥

Mantra without Swara
तनूनपादसुरो विश्ववेदा देवो देवेषु देवः । पथोऽअनक्तु मध्वा घृतेन् ॥

तनूनपादिति तनूऽनपात्। असुरः। विश्ववेदा इति विश्वऽवेदाः। देवः। देवेषु। देवः। पथः। अनक्तु। मध्वा। घृतेन॥१२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, जो वायू (देवेषु) द्यि गुणयुक्त पदार्थांत (देवः) उत्तम गुणवान आहे, जो (असुरः) प्रकाशरहित असून (विश्‍ववेदाः) सर्वांना सारखेपणाने प्राप्त होणारा आहे, तो (तनूनपात्) शरीराला सोडत नाही (प्राण, अपानादी रूपाने शरीराला व्यापून असतो) अशा (देवः) कामना करण्यास योग्य (मध्वा) (घृतेन) जलासोबत (राहतो) आणि (पथः) श्रोत्र आदी इंद्रियांच्या मार्गात (अनक्तु) त्यांचा सहाय्यक होतो (वायूमुळे मनुष्य ऐकूं शकतात) अशा वायूच्या सर्व गुणांना, हे मनुष्यांनो, तुम्ही जाणून घ्या. ॥12॥
Essence
भावार्थ - जसा परमेश्‍वर महादेवता, सर्वव्यापी आणि सर्वांना सुख देणारा आहे, तसाच वायूही आहे. कारण की या वायूशिवाय कोणीही प्राणी कुठेही जाऊ शकत नाही. ॥12॥
Subject
वायू कोणत्या पदार्थाप्रमाणे कार्यसाधक आहे, यावषियी -