Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 26 / Mantra 8

26 Mantra
26/8
Devata- वैश्वनरो देवता Rishi- कुत्स ऋषिः Chhand- जगती Swara- निषादः
Mantra with Swara
वै॒श्वा॒न॒रो न॑ ऊ॒तय॒ऽआ प्र या॑तु परा॒वतः॑। अ॒ग्निरु॒क्थेन॒ वाह॑सा। उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि वैश्वान॒राय॑ त्वै॒ष ते॒ योनि॑र्वैश्वान॒राय॑ त्वा॥८॥

वै॒श्वा॒न॒रः। नः॒। ऊ॒तये॑। आ। प्र। या॒तु। प॒रा॒वतः॑। अ॒ग्निः। उ॒क्थेन॑। वाह॑सा। उ॒प॒या॒मगृ॑हीत इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। वै॒श्वा॒न॒राय॑। त्वा॒। ए॒षः। ते॒। योनिः॑। वै॒श्वा॒न॒राय॑। त्वा॒ ॥८ ॥

Mantra without Swara
वैश्वानरो नऽऊतयऽआ प्र यातु परावतः । अग्निरुक्थेन वाहसा । उपयामगृहीतोसि वैश्वानराय त्वैष ते योनिर्वैश्वानराय त्वा ॥

वैश्वानरः। नः। ऊतये। आ। प्र। यातु। परावतः। अग्निः। उक्थेन। वाहसा। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। वैश्वानराय। त्वा। एषः। ते। योनिः। वैश्वानराय। त्वा॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (वैश्‍वानरः) समस्त नायकांमधे सर्वाधिक प्रसिद्ध विद्वान, (परावतः) (आम्ही रक्षणासाठी हाक दिल्यानंतर) आपण दुरून वा दूरस्थ प्रदेशावरून (नः) आमच्या रक्षणासाठी (आ, प्र, यातु) त्वरित अवश्य या. आपण (अग्निः) अग्नीप्रमाणे तेजस्वी असून (उक्थेन) प्रशंसनीय आहात. (वाहसा) आवश्यक त्या वेळेवर त्या त्या कार्यांसांी प्राप्त होरारे आहात. आपण (वैश्‍वानराय) प्रकाश इच्छिणार्‍या व्यक्तीसाठी (उपायामगृहीतः) विद्या आणि विचारांनी प्रेरित होणारे (असि) आहात. (त्वा) अशा आपणाला आणि (ते) आपल्या (एष) या घराला, जे (वैश्‍वानराय) समस्त नायकजनांसाठी उत्तम आश्रयस्थळ आहे, अशा त्या (योनिः) घराला व (त्वा) आपणाला आम्ही स्वीकार करतो (आपल्या आश्रयास येतो) आपणही आम्हाला आश्रयीं घ्या. ॥8॥
Essence
भावार्थ -या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. सूर्य जसा दूरस्थ असूनही आपल्या प्रकाशाने अतिदूरस्थ पदार्थांनाही प्रकाशित करतो, तद्वत विद्वान जन आपल्या सदुपदेशाद्वारे दूरस्थ (दूर दूरच्या प्रदेशाहून येणार्‍या) जिज्ञासूजनांनाही संतुष्ट करतात. ॥8॥
Subject
मनुष्यांनी कोणाप्रमाणे कोणते कार्य करावे, याविषयी -