Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 26 / Mantra 3

26 Mantra
26/3
Devata- ईश्वरो देवता Rishi- गृत्समद ऋषिः Chhand- भुरिगत्यष्टिः Swara- गान्धारः
Mantra with Swara
बृह॑स्पते॒ऽअति॒ यद॒र्योऽअर्हा॑द् द्यु॒मद्वि॒भाति॒ क्रतु॑म॒ज्जने॑षु। यद्दी॒दय॒च्छव॑सऽ ऋतप्रजात॒ तद॒स्मासु॒ द्रवि॑णं धेहि चि॒त्रम्। उ॒प॒या॒मगृ॑हीतोऽसि॒ बृह॒स्पत॑ये त्वै॒ष ते॒ योनि॒र्बृह॒स्पत॑ये त्वा॥३॥

बृह॑स्पते। अति॑। यत्। अ॒र्यः। अर्हा॑त्। द्यु॒मदिति॑ द्यु॒ऽमत्। वि॒भातीति॑ वि॒ऽभाति॑। क्रतु॑म॒दिति॒ क्रतु॑ऽमत्। जने॑षु। यत्। दी॒दय॑त्। शव॑सा। ऋ॒त॒प्र॒जा॒तेत्यृ॑तऽप्रजात। तत्। अ॒स्मासु॑। द्रवि॑णम्। धे॒हि॒। चि॒त्रम्। उ॒प॒या॒मगृ॑हीत॒ इत्यु॑पया॒मऽगृ॑हीतः। अ॒सि॒। बृह॒स्पत॑ये। त्वा॒। ए॒षः। ते॒। योनिः॑। बृह॒स्पत॑ये। त्वा॒ ॥३ ॥

Mantra without Swara
बृहस्पतेऽअति यदर्याऽअर्हाद्द्युमद्विभाति क्रतुमज्जनेषु । यद्दीदयच्छवसऽऋतप्रजात तदस्मासु द्रविणन्धेहि चित्रम् । उपयामगृहीतोसि बृहस्पतये त्वैष ते योनिर्बृहस्पतये त्वा ॥

बृहस्पते। अति। यत्। अर्यः। अर्हात्। द्युमदिति द्युऽमत्। विभातीति विऽभाति। क्रतुमदिति क्रतुऽमत्। जनेषु। यत्। दीदयत्। शवसा। ऋतप्रजातेत्यृतऽप्रजात। तत्। अस्मासु। द्रविणम्। धेहि। चित्रम्। उपयामगृहीत इत्युपयामऽगृहीतः। असि। बृहस्पतये। त्वा। एषः। ते। योनिः। बृहस्पतये। त्वा॥३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (बृहस्पते) महान प्रकृती आदी पदार्थ आणि प्राणिमात्राचे पालक हे ईश्‍वर, आपण (उपयामगृहीतः) यम, नियमादी योगसाधनांद्वारे ज्ञातव्य व प्राप्तव्य (असि) आहात. आम्ही (आपले उपासक) आपणाला (बृहस्पतये) महान वेदवाणीच्या पालन, संरक्षणासाठी (स्वीकार करतो) तसेच (ते) आपले (एषः) हे जे (योनिः) प्रमाण आहे (म्हणजे वेदवाणी ही आपल्या अस्तित्वाचे प्रमाण (पुरावा) आहे. अशा (बृहस्पतये) मोठ मोठ्या विद्वानांचेही पालन करणारे जे आपण, अशा त्या महान (त्वा) महत्तम ईश्‍वराचा आम्ही आपला स्वीकार करतो. हे भगवन्, आपण (ऋतप्रजात) सत्याला जन्म देणारे असे (अर्यः) हे परमात्मन्, आपण (जनेषु) मनुष्यांना (अहति्) योग्य कामासाठी (यत्) जे (द्युमत्) प्रशंसनीय प्रकाशयुक्त मन दिले आहे, तसेच (क्रतुमत्) बुद्धि आणि कर्माची प्रेरणा देणारे मन दिले आहे, ते (अति, विभाति) अत्यंत उत्तम व सत्याकडे प्रेरित करणारे आहे. या जगात (यत्) जे काही (शवसा) शक तीद्वारे प्रकाशित होत विद्यमान आहे (तत्) ते (चित्रम्) आश्‍चर्यरूप ज्ञान, (द्रविणम्) धन आणि कीर्ती (अस्मासु) आम्हा लोकांसाठी (तुमचा उपासकांसाठी) (धेहि) धारण करा (आम्हास प्रदान करा) ॥3॥
Essence
भावार्थ -हे मनुष्यांनो, ज्या ईश्‍वरापेक्षा कोणी अन्य महान नाही, त्यासारखा दयाळू, न्यायी आणि अत्यंत सूक्ष्म असा कोणताही पदार्थ नाही, ज्याने वेदज्ञान प्रकट करून सर्व मानवांकरिता दिले, ज्याने या जगात अद्भुत ज्ञान आणि धनसंपदा निर्माण केली, आणि जो योगाभ्यासाद्वारेच प्राप्तव्य आहे, तोच परमेश्‍वर आपणा सर्वांसाठी अति उपासनीय आहे, हे तुम्ही जाणून घ्या व ध्यानीं असू द्या ॥3॥
Subject
ईश्‍वर काम करतो, या विषयी -