Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 26 / Mantra 26

26 Mantra
26/26
Devata- अग्निर्देवता Rishi- मधुच्छन्दा ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
र॒क्षो॒हा वि॒श्वच॑र्षणिर॒भि योनि॒मयो॑हते। द्रोणे॑स॒धस्थ॒मास॑दत्॥२६॥

र॒क्षो॒हेति॑ रक्षः॒ऽहा। वि॒श्वच॑र्षणि॒रिति॑ वि॒श्वऽच॑र्षणिः। अ॒भि। योनि॑म्। अयः॑ऽहते। द्रोणे॑। स॒धस्थ॒मिति॑ स॒धऽस्थ॑म्। आ। अ॒स॒द॒त् ॥२६ ॥

Mantra without Swara
रक्षोहा विश्वचर्षणिरभि योनिमयोहतम् । द्रोणे सधस्थमासदत् ॥

रक्षोहेति रक्षःऽहा। विश्वचर्षणिरिति विश्वऽचर्षणिः। अभि। योनिम्। अयःऽहते। द्रोणे। सधस्थमिति सधऽस्थम्। आ। असदत्॥२६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जो (रक्षोहा) दुष्ट प्राण्यांना ठार करणारा आणि (विश्‍चचर्षणिः) सर्व जगाला (विद्येचा) प्रकाश देणारा विद्वान आहे, तो (अपोहते) स्वर्णाने निर्मित (सोन्याच्या) (द्रोणे) पात्रात अथवा वीस शेर धान्य ज्यात ठेवता येते (अशा पोते वा भांड्यात धान्य एकत्रित करून) सधस्थम्) सम स्थितीच्या (अधिक उंच नाही, खोल नाही, सपाट असलेले (योनिम्) घरात (अभि, आ, असदत्) योग्य प्रकारे स्थायी व स्थिर रूपाने राहून संपूर्ण सुख उपभोगावे, (अशी आम्हा नागरिक वा सामान्यजनांची इच्छा आहे) ॥26॥
Essence
भावार्थ - जे विद्वान अविद्येचा, अज्ञानाचा नाश करतात, विज्ञानाचा प्रकाश (प्रचार-प्रसार) करतात, सर्व ऋतूंत सुखकारक अशा सुवर्ण आदी धातूंनी निर्मित सोयी ज्यात आहेत, अशा घरात राहून मनन-चिंतन करतात, ते अवश्य सुखी होतात ॥26॥
Subject
पुनश्‍च तोच विषय -
Footnote
या अध्यायात पुरूषार्थांची फळें, सर्व मानवांना वेदपठन-वेदश्रवणाचा अधिकार, परमेश्‍वर, विदवन आणि सत्याचे निरूपण, अग्नी आदी पदार्थ, यज्ञ, सुंदर गृहांचे निर्माण, उत्तम स्थानात राहणे आदी विषय प्रतिपादिले आहेत. यामुळे या अध्यायाच्या अर्थाची संगती या पूर्वीच्या (25 व्या) अध्यायाच्या अर्थाशी आहे असे जाणावे. ॥^यजुर्वेदाच्या 26 व्या अध्यायाच्या मराठी भाष्यानुवाद समाप्त