Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 26 / Mantra 2

26 Mantra
26/2
Devata- ईश्वरो देवता Rishi- लौगाक्षिर्ऋषिः Chhand- स्वराडत्यष्टिः Swara- गान्धारः
Mantra with Swara
यथे॒मां वाचं॑ कल्या॒णीमा॒वदा॑नि॒ जने॑भ्यः। ब्र॒ह्म॒रा॒ज॒न्याभ्या शूद्राय॒ चार्या॑य च॒ स्वाय॒ चार॑णाय च। प्रि॒यो दे॒वानां॒ दक्षि॑णायै दा॒तुरि॒ह भू॑यासम॒यं मे॒ कामः॒ समृ॑ध्यता॒मुप॑ मा॒दो न॑मतु॥२॥

यथा॑। इ॒माम्। वाच॑म्। क॒ल्या॒णीम्। आ॒वदा॒नीत्या॒ऽवदा॑नि। जने॑भ्यः। ब्र॒ह्म॒रा॒ज॒न्या᳖भ्याम्। शूद्राय॑। च॒। अर्या॑य। च॒। स्वाय॑। च॒। अर॑णाय। प्रि॒यः। दे॒वाना॑म्। दक्षि॑णायै। दा॒तुः। इ॒ह। भू॒या॒स॒म्। अ॒यम्। मे॒। कामः॑। सम्। ऋ॒ध्य॒ता॒म्। उप॑। मा॒। अ॒दः। न॒म॒तु ॥२ ॥

Mantra without Swara
यथेमाँवाचङ्कल्याणीमावदानि जनेभ्यः । ब्रह्मराजन्याभ्याँ शूद्राय चार्याय च स्वाय चारणाय । प्रियो देवानान्दक्षिणायै दातुरिह भूयासमयम्मे कामः समृध्यतामुप मादो नमतु ॥

यथा। इमाम्। वाचम्। कल्याणीम्। आवदानीत्याऽवदानि। जनेभ्यः। ब्रह्मराजन्याभ्याम्। शूद्राय। च। अर्याय। च। स्वाय। च। अरणाय। प्रियः। देवानाम्। दक्षिणायै। दातुः। इह। भूयासम्। अयम्। मे। कामः। सम्। ऋध्यताम्। उप। मा। अदः। नमतु॥२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, मी ईश्‍वर, ज्याप्रमाणे (इमाम्) ही प्रकटिव (कल्याणीम्) सुख देणारी (वाचम्) चार वेदरूप वाणी (ब्रह्मराजन्याभ्याम्) ब्राह्मणासाठी, क्षत्रियासाठी आणि (अर्याय) वैश्यासाठी (देत आहे वा त्याचा उपदेश करीत आहे) त्याचप्रमाणे (शुद्राय) शुद्रासाठी (च) आणि (स्वाय) तुमच्या स्त्री, सेवक आदी लोकासाठी (च) आणि (अरणाय) उत्तम लक्षणयुक्त वा सदाचारी अंत्यजसाठी (च) देखील (मी ही प्रकट वेदवाणी) (आवदानि) सांगत आहे. आपण सर्वांनीदेखील सर्वांना तशाच प्रकारे या वेदवाणीचा उपदेश करावा. ज्या प्रमाणे मी, परमेश्‍वर, (दातुः) (या वेदवाणीचे दान करणार्‍या (देवानाम्) विद्वानांच्या (दशिणायै) दक्षिणा अर्थात् दान, (ज्ञानदान, विद्यादान) आदीसाठी (प्रियः) प्रिय (भूयासम्) आहे व होईल (मी मोठ्या आनंदाने त्याना हे वेदविद्येचे दान इतरांना देण्यासाठी देव आहे) (मे) माझी (अयम्) ही (काः) कामना (समृध्यताम्) अधिक प्रमाणात वाढो आणि (मा) मला (अदः) ते परोक्षसुख (उप, नमतु) प्राप्त होवो (हे सुख की विद्वान ही वेदवाणी सर्वांना देत आहेत. ते पाहून मी ईश्‍वर सुखी होत आहे. आपण सर्वजणही हीच कामना ठेवा आणि ते परोक्ष सुख मिळवा. ॥2॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे परमात्मा सर्व मानवांसाठी असा उपदेश करीत आहे की ही वेदरूप कल्याणकारीणी वाणी मी सर्व मनुष्यांच्या कल्याणासाठी दिली आहे. सर्वांना याचा अधिकार असून कोणीही याचा अनधिकारी नाही. ज्या प्रमाणे मी पक्षपात त्यागून सर्व मनुष्यांसाठी प्रिय वा सर्व मला प्रिय आहेत, तद्वत आपण सर्वजणही व्हा. असे केल्याने तुमची सर्व कामें पूर्ण होतील. ॥2॥
Subject
या मंत्रात परमेश्‍वर सर्व मानवांना वेदपठन आणि वेदश्रवणाचा अधिकार देत आहे, याविषयी -