Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 25 / Mantra 48

48 Mantra
25/48
Devata- विद्वान् देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- भुरिग्बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
तं त्वा॑ शोचिष्ठ दीदिवः सु॒म्नाय॑ नू॒नमी॑महे॒ सखि॑भ्यः। स नो॑ बोधि श्रु॒धी हव॑मुरु॒ष्या णो॑ अघाय॒तः सम॑स्मात्॥४८॥
Mantra without Swara
तं त्वा शोचिष्ठ दीदिवः सुम्नाय नूनमीमहे सखिभ्यः। स नो बोधि श्रुधि हवमुरुष्या णो अघायतः समस्मात् ॥

तम्। त्वा। शोचिष्ठ। दीदिव इति दीदिऽवः। सुम्नाय। नूनम्। ईमहे। सखिभ्य इति सखिऽभ्यः। सः। नः। बोधि। श्रुधी। हवम्। उरुष्य। नः। अघायतः। अघयत इत्यघऽयतः। समस्मात्॥४८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (शोचिष्ठ उत्तम गुणांमुळे देदीप्यमान, (दीदिवः) विद्या आदी गुणांनी सुशोभित हे विद्वान, आपण (नः) आम्हाला (बोधि) ज्ञान देता (तम्)(त्वा) अशा त्या आपणाला आम्ही (आपले विद्यार्थी (सुम्नाय) सुखप्राप्तीसाठी आणि (सखिभ्यः) मित्रप्राप्तीसाठी (नूनम्) अवश्यमेव (ईमहे) प्रार्थना करीत आहोत. (सः) ते आपण (नः) आमची (हवम्) हाक (श्रुधी) ऐका आणि (समस्मत्) अधर्माप्रमाणे वा अधर्माने वागणार्‍या, अधर्ममय गुण, कर्म आणि स्वभाव असणार्‍या आणि (अद्यायतः) आत्म्याच्या विरूद्ध वागणार्‍या दुर्जनांपासून, तसेच कष्टी व लुटारू लोकांपासून आमचे (उरूष्य) रक्षण करा. ॥48॥
Essence
भावार्थ - विद्यार्थ्यांनी अध्यापकाप्रत असे म्हणावे की आम्ही जे काही शिकले आहे, आपण आमची त्या विषयी परीक्षा घ्या. आम्हाला दुराचरणापासून दूर ठेवा की ज्यामुळे आम्ही सर्वांशी मित्राप्रमाणे वागू. ॥48॥
Subject
मनुष्यांनी या जगात कसे वागावे, याविषयी -
Footnote
या (25 व्या) अध्यायात जगातील पदार्थांच्या गुणांचे वर्णन, पशू आदी प्राण्यांचे प्रशिक्षण, पालन, आपल्या शरीरावयवांची काळजी, प्रभूची प्रार्थना, यज्ञाची प्रशंसा, बुद्धीची याचना, धर्माविषयी इच्छा, अश्‍वाचे गुण, त्याला चाल शिकविणे, आत्म्याचे ज्ञान आणि धनप्राप्तीची रीती या विषयांबाबत सांगितले आहे. यामुळे या अध्यायात सांगितलेल्या अर्थाची मागील (24 व्या) अध्यायाशी, अर्थाशी ऐक्य वा संगती आहे, हे लक्षात घ्यावे. ॥^यजुर्वेदाच्या 25 अध्यायाचा मराठी भाष्यनुवाद समाप्त