Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 25 / Mantra 37

48 Mantra
25/37
Devata- विद्वांसो देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- स्वराट् पङ्क्तिः Swara- पञ्चमः
Mantra with Swara
मा त्वा॒ग्निर्ध्व॑नयीद् धू॒मग॑न्धि॒र्मोखा भ्राज॑न्त्य॒भि वि॑क्त॒ जघ्रिः॑।इ॒ष्टं वी॒तम॒भिगू॑र्त्तं॒ वष॑ट्कृतं॒ तं दे॒वासः॒ प्रति॑ गृभ्ण॒न्त्यश्व॑म्॥३७॥

मा। त्वा॒। अ॒ग्निः। ध्व॒न॒यी॒त्। धू॒मग॑न्धि॒रिति॑ धू॒मऽग॑न्धिः। मा। उ॒खा। भ्राज॑न्ती। अ॒भि। वि॒क्त॒। जघ्रिः॑। इ॒ष्टम्। वी॒तम्। अ॒भिगू॑र्त्त॒मित्य॒भिऽगू॑र्त्तम्। वष॑ट्कृत॒मिति॒ वष॑ट्ऽकृतम्। तम्। दे॒वासः॑। प्रति॑। गृ॒भ्ण॒न्ति॒। अश्व॑म् ॥३७ ॥

Mantra without Swara
मा त्वाग्निर्ध्वनयीद्धूमगन्धिर्माखा भ्राजन्त्यभि विक्त जघ्रिः । इष्टँवीतमभिगूर्तँवषट्कृतन्तन्देवासः प्रति गृभ्णन्त्यश्वम् ॥

मा। त्वा। अग्निः। ध्वनयीत्। धूमगन्धिरिति धूमऽगन्धिः। मा। उखा। भ्राजन्ती। अभि। विक्त। जघ्रिः। इष्टम्। वीतम्। अभिगूर्त्तमित्यभिऽगूर्त्तम्। वषट्कृतमिति वषट्ऽकृतम्। तम्। देवासः। प्रति। गृभ्णन्ति। अश्वम्॥३७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे (देवासः) विद्वज्जन (इष्टम्) इच्छित आणि नंतर (वीतम्) प्राप्त केलेल्या (अभिगूर्तम्) सर्वप्रकारे यत्न करून (वषट्कृतम्) उचित क्रिया-प्रक्रियाद्वारे (शिक्षण-प्रशिक्षण देऊन) (अश्‍वम्) घोड्याला (गृभ्णन्ति) नीट परीक्षा करून ग्रहण करतात (युद्ध, वाहन वा वाहने यासाठी घोडा नीटपणे प्रशिक्षित आहे का, हे पाहून त्याचा स्वीकार करतात) त्या घोड्याविषयी तुम्ही देखील (अभि) सर्वप्रकारे (विक्त) जाणून घ्या (आत्म प्रशिक्षण कला शिकून घ्या) (त्वा) त्या घोड्याला (धूमगन्धिः) ज्यातून धूर निघत आहे अशा (अग्निः) अग्नीने (मा) (ध्वनयीत्) आपल्या (चट चट, पट पट ज्वाळांनी) शब्दांनी भय दाखवू नये तसेच (तम्) त्याला (जघ्रि) वासाच्या कोणत्या वस्तूंनी अथवा (भ्राजन्ती) चमकणारी (उखा) पातेल्यासारखी थोडींनी वस्तूंनी अथवा (भ्राजन्ती) चमकणारी (उखा) पातेल्यासरखी भांडींनी (मा) आकर्षित वा विचलित करूनये. (युद्धप्रसंगी वा स्वारीच्या वेळी कोणत्या मोठ्या आवाजाने वा चमकणार्‍या पदार्थाने घाबरून जाऊ नये, घोड्याला असे प्रशिक्षण दिले पाहिजे)॥37॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे विद्वान म्हणजे समाजातील शहाणी माणसे लोकांना मांसाहारापासून निवृत्त करतात आणि त्याचा परिणाम म्हणून घोडा आदी पशूंची वृद्धी करतात, त्याप्रमाणे तुम्हीही करीत जा. तसेच तुम्ही आपल्या पाळीव पशूंना अग्नी आदी विघ्नांपासून दूर ठेवा. 37॥
Subject
मनुष्यांनी मांस खाऊ नये, याविषयी -