Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 25 / Mantra 30

48 Mantra
25/30
Devata- विद्वांसो देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
उप॒ प्रागा॑त् सु॒मन्मे॑ऽधायि॒ मन्म॑ दे॒वाना॒माशा॒ऽउप॑ वी॒तपृ॑ष्ठः। अन्वे॑नं॒ विप्रा॒ऽऋष॑यो मदन्ति दे॒वानां॑ पु॒ष्टे च॑कृमा सु॒बन्धु॑म्॥३०॥

उप॑। प्र। अ॒गा॒त्। सु॒मदि॑ति॑ सु॒ऽमत्। मे॒। अ॒धा॒यि॒। मन्म॑। दे॒वाना॑म्। आशाः॑। उप॑। वी॒तपृ॑ष्ठ॒ इति॑ वी॒तऽपृ॑ष्ठः। अनु॑। ए॒न॒म्। विप्राः॑। ऋष॑यः। म॒द॒न्ति॒। दे॒वाना॑म्। पु॒ष्टे। च॒कृ॒म॒। सु॒बन्धु॒मिति॑ सु॒ऽबन्धु॑म् ॥३० ॥

Mantra without Swara
उप प्रागात्सुमन्मे धायि मन्म देवानामा शाऽउप वीतपृष्ठः । अन्वेनँविप्राऽऋषयो मदन्ति देवानाम्पुष्टे चकृमा सुबन्धुम् ॥

उप। प्र। अगात्। सुमदिति सुऽमत्। मे। अधायि। मन्म। देवानाम्। आशाः। उप। वीतपृष्ठ इति वीतऽपृष्ठः। अनु। एनम्। विप्राः। ऋषयः। मदन्ति। देवानाम्। पुष्टे। चकृम। सुबन्धुमिति सुऽबन्धुम्॥३०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - ज्याने (सुमत्) स्वतः) (देवनाम्) विद्वानांचा (वीतपृष्ठः) मागील भाग व्याप्त म्हणजे त्यांचे अनुकरण) केले. त्यांच्याप्रमाणे उत्तम कर्मे (अधामि) केली वा अनुगमन केले, त्यांचे आणि माझे (यन्म) विज्ञान, विशेष ज्ञान (आशाः) दिग्दिशांतरांपर्यंत (उप, प्र, अगात्) प्राप्त व्हावे, (अशी माझी कामना आहे) (एनम्) अशाच प्रकारचा विशेष कर्म व आचरणाद्वारे (अनु) सर्वांशी अनुकूल राहून (देवानाम्) आम्ही विद्वानांमधे (पुष्टे) पुष्ट व बलिष्ठ जन निर्माण करण्याकरिता तसेच (ऋषयः) मंत्राचा अर्थ जाणणारे (विप्राः) धीर बुद्धिमान पुरूष (उप, मदन्ति) त्या ऋषीच्या जवळ राहून आनंद मिळवतात, आम्ही देखील ऋषीजवळ राहून आनंद मिळवावे तसेच (सुबन्धुम्) सुंदर सुशील बंधू असलेल्या मनुष्याचे (परिवारातले सर्व भाऊ-बहिण) सुशील राहतील व होतील असे प्रयत्न (चकृम) आम्ही केले पाहिजेत. ॥30॥
Essence
भावार्थ -जे लोक विद्वानांजवळ बसून उत्तम ज्ञान प्राप्त करून ऋषी म्हणजे मननशील, विचारक होतात, ते इतर सर्वांना ज्ञान व विशेष ज्ञान देतात. जे कोणी एकमेकांस पूरक राहून त्यांची व स्वतःची उन्नती साधतात, ते जगांचे हितैषी ठरतात. ॥30॥
Subject
कोणी कोणापासून काय घ्यावे, याविषयी -