Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 25 / Mantra 23

48 Mantra
25/23
Devata- द्यौरित्यादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
अदि॑ति॒र्द्यौरदितिर॒न्तरि॑क्ष॒मदि॑तिर्मा॒ता स पि॒ता स पु॒त्रः।विश्वे॑ दे॒वाऽअदि॑तिः॒ पञ्च॒ जना॒ऽअदि॑तिर्जा॒तमदि॑ति॒र्जनि॑त्वम्॥२३॥

अदि॑तिः। द्यौः। अदि॑तिः। अ॒न्तरि॑क्षम्। अदि॑तिः। मा॒ता। सः। पि॒ता। सः। पु॒त्रः। विश्वे॑। दे॒वाः। अदि॑तिः। पञ्च॑। जनाः॑। अदि॑तिः। जा॒तम्। अदि॑तिः। जनि॑त्व॒मिति॒ जनि॑ऽत्वम् ॥२३ ॥

Mantra without Swara
अदितिर्द्यारदितिरन्तरिक्षमदितिर्माता स पिता स पुत्रः । विश्वे देवाऽअदितिः पञ्च जनाऽअदितिर्जातमदितिर्जनित्वम् ॥

अदितिः। द्यौः। अदितिः। अन्तरिक्षम्। अदितिः। माता। सः। पिता। सः। पुत्रः। विश्वे। देवाः। अदितिः। पञ्च। जनाः। अदितिः। जातम्। अदितिः। जनित्वमिति जनिऽत्वम्॥२३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ -हे मनुष्यानो, (द्यौः) कारणरूपात जो प्रकाशलोक (अदितिः) अखंडित आहे, (अंतरिक्षम्) अंतरिक्ष (अदितिः) अविनाशी आहे, सर्व जगाला जन्म देणारी प्रकृति (माता) आहे. (सः) तो परमेश्‍वर (पिता) नित्य आमचा पालक आहे. (पुत्रः) ईश्‍वराच्या पुत्राप्रमाणे (अदितिः) हे जग कारणरूपे अविनाशी आहे (प्रकृतीपासून या जगाची रचना केली आहे) आणि प्रकृती नित्य आहे. (विश्‍वे) (देवाः) पृथ्वीवरील सर्व दिव्यगुणधारक पदार्थ (अदितिः) कारण रूपे म्हणजे मूळ नित्य कारण प्रकृती पासून उत्पन्न असून कारण रूपाने नित्य अविनाशी आहेत. (पंच) पाच (जनाः) लोक अथवा पंचप्राण (अदितिः) काररूपे अविनाशी आहेत. तसेच (जातम्) उत्पन्न झालेले जे जे कार्य रूप जग वा पदार्थ आहेत, ते सर्वे प्रकृतीपासून (जनित्वम्) उत्पन्न झालेले असल्यामुळे (अदितिः) कारणरूपाने नित्य वा अविनाशी आहेत, असे जाणावे. ॥23॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यानों, तुम्ही जे हे कार्यरूप उत्पन्न जग पाहत आहा, त्याला अदृष्ट कारण रूप म्हणजे मूलतः प्रकृती कारणोत्पन्न जाणा. सृष्टीची रचना करणारा परमात्मा, जीवात्मा, पृथ्वी आदी तत्त्व, जे जे उत्पन्न झाले आहे, आणि जे उत्पन्न होईल, तसेच ही प्रकृती स्वरूपेण नित्य आहे. या प्रकृतीचा कधी अभाव होत नाही आणि शिवाय हे ही जाणून घ्या की अभावातून भावाची उत्पत्ती कदापी होत नाही. ॥23॥
Subject
पुढील मंत्रात अदिति शब्दाचे अनेक अर्थ आहेत, याविषयी.