Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 25 / Mantra 20

48 Mantra
25/20
Devata- विद्वांसो देवता Rishi- गोतम ऋषिः Chhand- जगती Swara- निषादः
Mantra with Swara
पृष॑दश्वा म॒रुतः॒ पृश्नि॑मातरः शुभं॒ यावा॑नो वि॒दथे॑षु जग्म॑यः।अ॒ग्नि॒जि॒ह्वा मन॑वः॒ सूर॑चक्षसो॒ विश्वे॑ नो दे॒वाऽअव॒साग॑मन्नि॒ह॥२०॥

पृष॑दश्वा॒ इति॒ पृष॑त्ऽअश्वाः। म॒रुतः॑। पृश्नि॑मातर॒ इति॒ पृश्नि॑ऽमातरः। शु॒भं॒यावा॑न॒ इति॑ शुभ॒म्ऽयावा॑नः। वि॒दथे॑षु जग्म॑यः अ॒ग्नि॒जि॒ह्वा इत्य॑ग्निऽजिह्वाः। मन॑वः। सूर॑चक्षस॒ इति॒ सूर॑ऽचक्षसः। विश्वे॑। नः॒। दे॒वाः। अव॑सा। आ। अ॒ग॒म॒न्। इ॒ह ॥२० ॥

Mantra without Swara
पृषदश्वा मरुतः पृश्निमातरः शुभँयावानो विदथेषु जग्मयः । अग्निजिह्वा मनवः सूरचक्षसो विश्वे नो देवाऽअवसा गमन्निह ॥

पृषदश्वा इति पृषत्ऽअश्वाः। मरुतः। पृश्निमातर इति पृश्निऽमातरः। शुभंयावान इति शुभम्ऽयावानः। विदथेषु जग्मयः अग्निजिह्वा इत्यग्निऽजिह्वाः। मनवः। सूरचक्षस इति सूरऽचक्षसः। विश्वे। नः। देवाः। अवसा। आ। अगमन्। इह॥२०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जे (पृश्‍निमातरः) अंतरिक्ष ज्या वायूच्या मातेप्रमाणे आहे, त्या वायूप्रमाणे (पृषदश्‍वाः) परिपुष्ट अंगाचे वेगवान बलिष्ठ घोडे ज्यांच्याजवळ आहेत, ते (मरूतः) मनुष्य (आम्हाला-सर्वजनांना मिळोत त्यांची संगती मिळे) तसेच (विदथेषु) युद्धामधे (शुभयावानः) उत्तम सुख म्हणजे विजय प्राप्त करणारे (जग्मयः) तसेच आमचा संग वा आमच्याजवळ राहून आमचे रक्षण करण्यासाठी (आम्हांस प्राप्त व्हावेत) (अग्निजिह्वा) अग्नी प्रमाणे तेजस्वी वाणी असलेले आणि (सूरचक्षसः) ऐश्‍वर्य व प्रेरणा देणारे असे (विश्‍वे) (देवाः) समस्त विद्वान (मनस्वः) मननशील जन (अवसा) सर्वांचे रक्षण करण्यात समर्थ आहेत. ते लोक (इह) या संसारात वा या कठीण प्रसंगी (नः) अम्हाला (आ, अगमन्) प्राप्त व्हावेत. (अशी आमची इच्छा आहे) ॥20॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. मनुष्यांनी विद्वानांचा सहवास नेहमी प्रार्थनीय व वांछनीय मानावा. या सृष्टीत जसे वायू आदी पदार्थ सर्व मनुष्यांसाठी आणि प्राण्यांच्या जीवनाचे कारण वा आधार आहेत, चेतना पदार्थांत वा मानवसमाजात तेच महत्वाचे स्थान विद्वानांचे आहे. ॥20॥
Subject
कोणी काय काम करावे, याविषयी -