Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 25 / Mantra 13

48 Mantra
25/13
Devata- परमात्मा देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृत त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
यऽआ॑त्म॒दा ब॑ल॒दा यस्य॒ विश्व॑ऽउ॒पास॑ते प्र॒शिषं॒ यस्य॑ दे॒वाः।यस्य॑ छा॒याऽमृतं॒ यस्य॑ मृ॒त्युः कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम॥१३॥

यः। आ॒त्म॒दा। इत्या॑त्म॒ऽदाः। ब॒ल॒दा इति॑ बल॒ऽदाः। यस्य॑। विश्वे॑। उ॒पास॑त॒ इत्यु॑प॒ऽआस॑ते। प्र॒शिष॒मिति॑ प्र॒ऽशिष॑म्। यस्य॑। दे॒वाः। यस्य॑। छा॒या। अ॒मृत॑म्। यस्य॑। मृ॒त्युः। कस्मै॑। दे॒वाय॑। ह॒विषा॑। वि॒धे॒म॒ ॥१३ ॥

Mantra without Swara
यऽआत्मदा बलदा यस्य विश्व उपासते प्रशिषँयस्य देवाः । यस्य छायामृतँयस्य मृत्युः कस्मै देवाय हविषा विधेम ॥

यः। आत्मदा। इत्यात्मऽदाः। बलदा इति बलऽदाः। यस्य। विश्वे। उपासत इत्युपऽआसते। प्रशिषमिति प्रऽशिषम्। यस्य। देवाः। यस्य। छाया। अमृतम्। यस्य। मृत्युः। कस्मै। देवाय। हविषा। विधेम॥१३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, (यः) जो परमेश्‍वर (आत्मदाः) आत्म्याला (आत्मिकबळ) देणारा असून (बलदाः) शारीरिक शक्ती देणारा आहे, (विश्‍वे)(देवाः) सर्व विद्वज्जन (यस्य) ज्याच्या (प्रशिषम्) उत्तम प्रेरणा आणि आज्ञेप्रमाणे (उपासते) आचरण करतात (त्याची तुम्ही उपासना करा) (यस्य) ज्याच्या सामर्थ्यामुळे जगातील सर्व व्यवहार चालतात, (यस्य) ज्याची (छाया) छाया वा आश्रम (अमृतम्) अमृतस्वरूप आहे आणि (यस्य) ज्याच्या आज्ञेचा भंग करणे मृत्युप्रमाणे आहे, त्या (कस्मै) सुखस्वरूप (देवाय) स्तवनीय परमेश्‍वरासाठी आम्ही (हविषा) हवनीय वा यज्ञीय पदार्थांद्वारे होमादीकरून (विधेम)
Essence
त्याची सेवा वा उपासना करतो. हे मनुष्यानो, आमच्याप्रमाणे तुम्हीही त्याची सेवा वा उपासना व यज्ञादी कर्म करा. ॥13॥^भावार्थ - हे मनुष्यांनो, ज्या परमेश्‍वराच्या श्रेष्ठ नियमाप्रमाणे ठरविलेल्या मर्यादेत सूर्य आदी लोक विद्यमान आहेत, ज्या सूर्याशिवाय पाऊस पडणे तसेच पावसाच्या सर्वक्रम-व्यवसक्ता आदी होतात (सूर्यामुळे समुद्राच्या जलाचे बाष्पीकरण होणे आदी नियम आहेत) तो सवितालोक ज्या परमेश्‍वराने निर्माण केला आहे, सर्व मनुष्यांनी त्या परमेश्‍वराची उपासना केली पाहिजे. ॥13॥
Subject
उपासना केल्यामुळे ईश्‍वर उपासकाला काय देतो, याविषयी -