Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 25 / Mantra 10

48 Mantra
25/10
Devata- हिरण्यगर्भो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
हि॒र॒ण्य॒ग॒र्भः सम॑वर्त्त॒ताग्रे॑ भू॒तस्य॑ जा॒तः पति॒रेक॑ऽआसीत्। स दा॑धार पृथि॒वीं द्यामु॒तेमां कस्मै॑ दे॒वाय॑ ह॒विषा॑ विधेम॥१०॥

हि॒र॒ण्य॒ग॒र्भ इति॑ हिरण्यऽग॒र्भः। सम्। अ॒व॒र्त्त॒त॒। अग्रे॑। भू॒तस्य॑। जा॒तः। पतिः॑। एकः॑। आ॒सी॒त्। सः। दा॒धा॒र॒। पृ॒थि॒वीम्। द्याम्। उ॒त। इ॒माम्। कस्मै॑। दे॒वाय॑। ह॒विषा॑। वि॒धे॒म॒ ॥१० ॥

Mantra without Swara
हिरण्यगर्भः समवर्तताग्रे भूतस्य जातः पतिरेकऽआसीत् । स दाधार पृथिवीन्द्यामुतेमाङ्कस्मै देवाय हविषा विधेम ॥

हिरण्यगर्भ इति हिरण्यऽगर्भः। सम्। अवर्त्तत। अग्रे। भूतस्य। जातः। पतिः। एकः। आसीत्। सः। दाधार। पृथिवीम्। द्याम्। उत। इमाम्। कस्मै। देवाय। हविषा। विधेम॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यानो, (हिरण्यगर्भः) सूर्यादी सर्व तेजोमय पदार्थ ज्यात अंतर्भूत आहेत, तो परमात्मा (जातः) विद्यमान वा जन्मलेल्या आणि (भूतस्य) उत्पन्न झालेल्या सर्व जगाचा (एकः) एकमेव आणि स्वयंसमर्थ असा स्वामी असून (अग्ने) भूमी आदी लोकांच्या रचने पूर्वी सृष्टीपूर्वी (पतिः) त्या सृष्टीचा पालक (आसीत्) होता व आहे. (सः) तोच (पृथिवीम्) आपल्या आकर्षण शक्तीने पृथवीचे (उत) आणि (द्याम्) प्रकाश-लोकाचे (सम्, दाधार) उत्तमप्रकारे धारण करतो. तोच (इमाम्) या सृष्टीचा निर्मात्याला (कस्मै) जो सर्वथा सुख देणारा आहे, त्या (देवाय) तेजोमय ज्योतिर्मय परमेश्‍वराचा, हे मनुष्यानो, ज्याप्रमाणे आम्ही (ज्येष्ठ उपासक विद्वान)(हविषा) होम करण्यास योग्य अशा पदार्थांनी (विधेम) विधान वा आयोजन करतो, त्याप्रमाणे तुम्हीही त्याची हवीद्वारे उपासना करा. ॥ भक्तिभावाने त्याची उपासना करा)॥10॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यानो, ज्या परमेश्‍वराने या सूर्य आदी समस्त पदार्थांची आणि सृष्टीची रचना आपल्या अनंत सामर्थ्याने केली आहे, आणि जो एकटाच सर्व सृष्टीला धारण करीत आहे, तुम्ही त्याचीच उपासना करा अन्य कोणाची नको ॥10॥
Subject
आता तो परमेश्‍वर कसा आहे, याविषयी -