Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 24 / Mantra 8

40 Mantra
24/8
Devata- इन्द्राग्न्यादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- स्वराट् बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
एता॑ऽऐन्द्रा॒ग्ना द्वि॑रू॒पाऽअ॑ग्नीषो॒मीया॑ वाम॒नाऽअ॑न॒ड्वाह॑ऽ आग्नावैष्ण॒वा व॒शा मै॑त्रावरु॒ण्योऽन्यत॑ऽएन्यो मै॒त्र्यः॥८॥

एताः॑। ऐ॒न्द्रा॒ग्नाः। द्वि॒रू॒पा इति॑ द्विऽरू॒पाः। अ॒ग्नी॒षो॒मीयाः॑। वा॒म॒नाः। अ॒न॒ड्वाहः॑। आ॒ग्ना॒वै॒ष्ण॒वाः। व॒शा। मै॒त्रा॒व॒रु॒ण्यः᳕। अ॒न्यत॑एन्य॒ इत्य॒न्यतः॑ऽएन्यः। मै॒त्र्यः᳖ ॥८ ॥

Mantra without Swara
एताऽऐन्द्राग्ना द्विरूपाऽअग्नीषोमीया वामनाऽअनड्वाहऽआग्नावैष्णवा वशा मैत्रावरुण्योन्यतऽएन्यो मैत्र्यः ॥

एताः। ऐन्द्राग्नाः। द्विरूपा इति द्विऽरूपाः। अग्नीषोमीयाः। वामनाः। अनड्वाहः। आग्नावैष्णवाः। वशा। मैत्रावरुण्यः। अन्यतएन्य इत्यन्यतःऽएन्यः। मैत्र्यः॥८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनूष्यांनो, (एताः) ते पूर्ववर्णित म्हणजे पशू (द्विरूपा) जे दोन-दोन रूप धारण करतात. ते (ऐन्द्राग्नाः) वायू व विद्युत देवतामय जाणा. जे (वामना) वाकड्या अंगाचे वा बुटके पशू आणि जे (अनड्वाहः) बैल आहेत, ते (अग्नीषोमीयाः) सोम व अग्नीदेवतामय तसेच (आग्नावैष्णवाः) अग्नी व वायुदेवतामय आहेत, असे जाणा. ज्या (सशाः) वन्ध्या गायी आहेत, त्या (मैत्रावरूण्यः) प्राण व उदान देवतामय असून जे (अन्यएतन्यः) कुठून प्राप्त झाले आहेत (ज्यांची जाती-प्रजाती ठाऊक नाही) असे पशू (मैत्र्यः) मित्राप्रमाणे प्रिय आचरणाद्वारे सेवनीय वा पालन करण्यास योग्य आहेत असे जाणावे. ॥8॥
Essence
भावार्थ- जे लोक वायू आणि अग्नी आदींचे गुण असलेल्या गौ आदी पशूंचे पालन करतात, ते सार्‍या जगावर उपकार करणारे असतात (त्यांच्यामुळे जगावर त्यांचे उपकार होतात ) ॥8॥
Subject
पुन्हा त्याच विषयी -