Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 24 / Mantra 40

40 Mantra
24/40
Devata- विश्वेदेवादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- शक्वरी Swara- धैवतः
Mantra with Swara
ख॒ड्गो वै॑श्वदे॒वः श्वा कृ॒ष्णः क॒र्णो ग॑र्द॒भस्त॒रक्षु॒स्ते रक्ष॑सा॒मिन्द्रा॑य सूक॒रः सि॒ꣳहो मा॑रु॒तः कृ॑कला॒सः पिप्प॑का श॒कुनि॒स्ते श॑र॒व्यायै॒ विश्वे॑षां दे॒वानां॑ पृष॒तः॥४०॥

ख॒ड्गः। वै॒श्व॒दे॒व इति॑ वैश्वदे॒वः। श्वा। कृ॒ष्णः। क॒र्णः। ग॒र्द॒भः। त॒रक्षुः॑। ते। रक्ष॑साम्। इन्द्रा॑य। सू॒क॒रः। सि॒ꣳहः। मा॒रु॒तः। कृ॒क॒ला॒सः। पिप्प॑का। श॒कुनिः॑। ते। श॒र॒व्या᳖यै। विश्वे॑षाम्। दे॒वाना॑म्। पृ॒ष॒तः ॥४० ॥

Mantra without Swara
खङ्गो वैश्वदेवः श्वा कृष्णः कर्णा गर्दभस्तरक्षुस्ते रक्षसामिन्द्राय सूकरः सिँहो मारुताः कृकलासः पिप्पका शकुनिस्ते शरव्यायै विश्वेषान्देवानाम्पृषतः ॥

खड्गः। वैश्वदेव इति वैश्वदेवः। श्वा। कृष्णः। कर्णः। गर्दभः। तरक्षुः। ते। रक्षसाम्। इन्द्राय। सूकरः। सिꣳहः। मारुतः। कृकलासः। पिप्पका। शकुनिः। ते। शरव्यायै। विश्वेषाम्। देवानाम्। पृषतः॥४०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो (खङ्गः) उंच आणि टोकदार शिंगे असलेला गैंडा (वैश्‍वदेवः) सर्व विद्वज्जनांसाठी आहे, असे जाणावे. जो (कृष्णः) काळ्या रंगाचा (श्‍वान) कुत्रा आहे, तसेच जो (कर्णः) लांब व मोठे कान असलेला (गर्दभः) गाढव आणि (तरक्षुः) वाघ (अथवा तरस पशू) आहे (ते) ते सर्व प्राणी (रक्षसाम्) राक्षसाकरिता, दुष्ट आणि हिंसक प्रवृत्तीच्या मनुष्यांकरिता आहेत, असे जाणा. जो (सूकरः) डुक्कर आहे, तो (इन्द्राय) शत्रूंना ठार मारणार्‍या राजाकरिता तसेच जो (सिंहः) सिंह आहे, तो (मारूतः) मरूत देवतेची गुण असलेला जाणावा. जो (कृकलासः)(गिरगिट) रंग बदलणारा प्राणी म्हणजे सरडा तसेच (पिप्पका) जी पिप्पका नावाची लहानशी चिमणी आणि (शकुनिः) पक्षी (सर्व सामान्य पक्षी) अथवा पक्षीमात्र आहेत, (ते) ते सर्व (शरव्यायै) शरवतया कुशल उत्तम मनुष्यासाठी आहेत आणि जी (पृषतः) पृषग् जातीची हरणें आहेत, ते सर्व प्राणी (विश्‍वेषाम्) सर्व (देवानाम्) विद्वज्जनांकरिता आहेत, असे जाणावे ॥40॥
Essence
भावार्थ - सर्व पशू-पक्ष्यांमधे जे जे गुण आहेत, ते ओळखून माणसांनी आवश्यक कार्यसिद्धीकरिता त्या गुणांचा उपयोग घेतला पाहिजे. ॥40॥
Subject
पुन्हा, तोच विषय -
Footnote
या चोवीसाव्या अध्यायात पशू-पक्षी, सरपटणारे प्राणी साप आदी, वन्य मृग, जलचर प्राणी आणि किडे-मुंग्या मुंगळे आदी कीटकांच्या गुणांचे वर्णन केले आहे. या अध्यायाच्या अर्थाची संगती मागील तेवीसाव्या अध्यायात सांगितलेल्या विषयांशी व अर्थाशी सुसंबद्ध आहे, असे जाणावे. ॥