Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 24 / Mantra 3

40 Mantra
24/3
Devata- अश्व्यादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृदतिजगती Swara- निषादः
Mantra with Swara
शु॒द्धवा॑लः स॒र्वशु॑द्धवालो मणि॒वाल॒स्तऽआ॑श्वि॒नाः श्येतः॑ श्येता॒क्षोऽरु॒णस्ते रु॒द्राय॑ पशु॒पत॑ये क॒र्णा या॒माऽअ॑वलि॒प्ता रौ॒द्रा नभो॑रूपाः पार्ज॒न्याः॥३॥

शु॒द्धवा॑ल॒ इति॑ शु॒द्धऽवा॑लः। स॒र्वशु॑द्धवाल॒ऽइति॑ स॒र्वऽशु॑द्धवालः। म॒णि॒वाल॒ इति॑ मणि॒ऽवालः॑। ते। आ॒श्वि॒नाः। श्येतः॑। श्ये॒ता॒क्ष इति॑ श्येतऽअ॒क्षः। अ॒रु॒णः। ते। रु॒द्राय॑। प॒शु॒पत॑य॒ इति॑ पशु॒ऽपत॑ये। क॒र्णाः। या॒माः। अ॒व॒लि॒प्ता इत्य॑वऽलि॒प्ताः। रौ॒द्राः। नभो॑रूपा॒ इति॒ नभः॑ऽरूपाः। पा॒र्ज॒न्याः ॥३ ॥

Mantra without Swara
शुद्धवालः सर्वशुद्धवालो मणिवालस्त आश्विनाः श्येतः श्येताक्षो रुणस्ते रुद्राय पशुपतये कर्णा यामा अवलिप्ता रौद्रा नभोरूपाः पार्जन्याः ॥

शुद्धवाल इति शुद्धऽवालः। सर्वशुद्धवालऽइति सर्वऽशुद्धवालः। मणिवाल इति मणिऽवालः। ते। आश्विनाः। श्येतः। श्येताक्ष इति श्येतऽअक्षः। अरुणः। ते। रुद्राय। पशुपतय इति पशुऽपतये। कर्णाः। यामाः। अवलिप्ता इत्यवऽलिप्ताः। रौद्राः। नभोरूपा इति नभःऽरूपाः। पार्जन्याः॥३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, हे जाणून घ्या अथवा ही माहिती लक्षात असू द्या की (शुद्धवालः) ज्या पशूच्या अंगावरील केस स्वच्छ आणि चकचकीत आहेत, अथवा ज्याचे शरीरावयव लहान-लहान आहेत. तसेच ज्या पशूचे (सव शुद्धवालः) समस्त केस अती स्वच्छ तसेच (मणिवालः) मणीप्रमाणे चमकदार आहेत, (ते) त्या सर्व पशूंचा (आश्‍विनाः) देवता सूर्य आणि चंद्र आहे, असे समजावे म्हणजे ते पशू सूर्य व चंद्राप्रमाणे दिव्यगुणधारक आहेत. तसेच ज्या पशूंची (श्‍वेतः) रंग पांढरा असून ज्याचे (श्‍वेताक्षः) पांढरे डोळे पांढर्‍या रंगाचे आहेत आणि (अरूणाः) शरीराचा रंग लाल आहे (ते) ते सर्व पशू (पशुषतये) पशूंची रक्षा करणार्‍या मालकासाठी लाभकारी आहेत आणि (रुद्राय ) त्या पशूंमुळे दुष्टांवर (चोर, लुटारू आदींवर) रडण्याची वेळ येते (ते आपल्या स्वामाशी फार प्रामाणिक असतात व प्रसंगी मालकाचे रक्षण करतात) जे पशू (कर्णाः) (शेतीची वा वाहनाविषयीची) कामें करतात, ते पशू (वामाः) वायूदेवतामय जाणावेत. ज्या पशूंचे अंग उन्नत (अवलिप्ताः) उन्नत आणि शरीर स्थूल आहे, त्यांना (रौद्राः) प्राणवायूमय देवतामय असून ज्या पशूंचा रंग (नभोरूपाः) आकाशवत् नीलवर्ण आहे, त्या सर्व पशूंचे देवता (पार्जन्याः) मेघ आहे, असे जाणावे. ॥
Essence
भावार्थ - या मंत्रात ज्या पशूचा जो जो देवता सांगितलेला आहे, तो पशू त्या त्या देवतेचे गुण धारण करणारा आहे, असे जाणावे ॥3॥
Subject
या मंत्रात कोणते पशू कोणकोणते गुण धारण करतात, या यिषयी -