Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 24 / Mantra 26

40 Mantra
24/26
Devata- भूम्यादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- भुरिगनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
भूम्या॑ऽआ॒खूनाल॑भते॒ऽन्तरि॑क्षाय पा॒ङ्क्तान् दि॒वे कशा॑न् दि॒ग्भ्यो न॑कु॒लान् बभ्रु॑कानवान्तरदि॒शाभ्यः॑॥२६॥

भूम्यै॑। आ॒खून्। आ। ल॒भ॒ते॒। अ॒न्तरि॑क्षाय। पा॒ङ्क्तान्। दि॒वे। कशा॑न्। दि॒ग्भ्य इति॑ दि॒क्ऽभ्यः। न॒कु॒लान्। बभ्रु॑कान्। अ॒वा॒न्त॒र॒दि॒शाभ्य॒ इत्य॑वान्तरऽदि॒शाभ्यः॑ ॥२६ ॥

Mantra without Swara
भूम्याऽआखूनालभतेन्तरिक्षाय पाङ्क्त्रान्दिवे कशान्दिग्भ्यो नकुलान्बभ्रुकानवाभ्यः ॥

भूम्यै। आखून्। आ। लभते। अन्तरिक्षाय। पाङ्क्तान्। दिवे। कशान्। दिग्भ्य इति दिक्ऽभ्यः। नकुलान्। बभ्रुकान्। अवान्तरदिशाभ्य इत्यवान्तरऽदिशाभ्यः॥२६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, जसा भूगर्भात राहणार्‍या प्राण्याच्या स्वभावातील गुण ओळखणारा माणूस (भूम्यै) भूमीसाठी (आखून्) उंदीराच्या गुणांचे परिपालन करतो (उंदीर हे भूमीचे रक्षक असून पीकनाशक कीटक आदींचा नाश करतात) तसेच तो (अन्तरिक्षाय) अंतरिक्षसाठी (पाङ्क्तान्) आकाशात पंक्तिबद्ध होऊन उडणारे बगळे आदी पक्ष्यांचे गुण ग्रहण करतो (विमानादीच्या उड्डाणाचे तंत्र शिकतो) तसेच तो (दिवे) प्रकाशासाठी (कशान्) कश नाम पक्ष्यांचे आणि (दिग्भ्यः) दिशांसाठी (नकुलान्) मुंगसाच्या गुणांचे निरीक्षण व पालन करतो, तसे तुम्हीही करा. (अवान्तरदिशाभ्यः) अवांतर दिशा म्हणजे आग्नेय आदी कोण-दिशांसाठी (बभ्रुकान्) भुर्‍या रंगाच्या विशेष प्रकारच्या मुंगुसांचे गुण (आ, लभते) प्राप्त करतो वा स्वीकारतो, तद्वत तुम्हीही करा. ॥26॥
Essence
भावार्थ - भूमीमधे भूमी पर्वत आदी स्थानात राहणार्‍या उंदीर आदी प्राण्यांचे गुण जे लोक ओळखून घेतात व त्यापासून आपल्यावर जगावर उपकार करतात, ते अति विज्ञानी होतात. ॥26॥
Subject
पुनश्‍च, त्याच विषयी -