Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 24 / Mantra 21

40 Mantra
24/21
Devata- वरुणो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
स॒मु॒द्राय॑ शिशु॒मारा॒नाल॑भते प॒र्जन्या॑य म॒ण्डूका॑न॒द्भ्यो मत्स्या॑न् मि॒त्राय॑ कुली॒पया॒न् वरु॑णाय ना॒क्रान्॥२१॥

स॒मु॒द्राय॑। शि॒शु॒मारा॒निति॑ शिशु॒ऽमारा॑न्। आ। ल॒भ॒ते॒। प॒र्जन्या॑य। म॒ण्डूका॑न्। अ॒द्भ्य इत्य॒प्ऽभ्यः। मत्स्या॑न्। मि॒त्राय॑। कु॒ली॒पया॑न्। वरु॑णाय। ना॒क्रान् ॥२१ ॥

Mantra without Swara
समुद्राय शिशुमारानलभते पर्जन्याय मण्डूकानद्भ्यो मत्स्यान्मित्राय कुलीपयाय नाक्रान् ॥

समुद्राय। शिशुमारानिति शिशुऽमारान्। आ। लभते। पर्जन्याय। मण्डूकान्। अद्भ्य इत्यप्ऽभ्यः। मत्स्यान्। मित्राय। कुलीपयान्। वरुणाय। नाक्रान्॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे जलीय प्राण्यांचे पालन करण्याविषयी ज्ञान असलेला माणूस (समुद्राय) महाजलाशय समुद्रासाठी (शिशुमारान्) आपल्या शिशूंनी हत्या करणार्‍या (जलीय प्राण्यांना पकडतो व अशा प्रकारे शिशूंची रक्षा करतो) तसेच (पर्जन्याय) मेघांसाठी (मण्डूकान्) बेडुक प्राप्त करतो (बेडूक ओरडणे पावसाचे चिन्ह असावे म्हणून) तसेच (अद्भ्यः) पाण्यासाठी (मत्स्यान्) जलीय माशांना (पकडतो त्यांना सांभाळतो व त्यांची वंशवृद्धी करतो) (मित्राय) मित्रवत सुख देणार्‍या सूर्यासाठी (कुलीपयान्) कुलीपय नावाच्या वन्य, पशू (वा जलीय जीव) पकडतो आणि (वरुणाय) वरूणासाठी (नाक्रान्) मगर आदी जलीय हिंसक प्राण्यांना बंदिस्त करतो (आ, लाभते) (अशाप्रकारे तो जलजीवपालक मनुष्य या सर्व पशूंना त्यांच्यातील हिंसकत्ववृत्ती दूर करीत त्यांचे पालन-संवधर्नासाठी) प्राप्त करतो, तशाप्रकारे, हे मनुष्यांनो, तुम्हीही (जलीय पशूंचे पालन-संरक्षण) करा (कारण तेही पर्यावरण समतोल राखण्यासाठी आवश्यक आहे) ॥21॥
Essence
भावार्थ - जसे जलचर प्राण्यांचे गुण जाणणारा माणूस त्या जलजन्तूंचे रक्षण व त्यांना पकडून त्यांची वृद्धी करतात, तशा प्रकारे इतर लोकांनीही केले पाहिजे. ॥21॥
Subject
कोणी कोणाचे कोणासाठी सेवन करावे, याविषयी -