Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 24 / Mantra 14

40 Mantra
24/14
Devata- अग्न्यादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- भुरिगतिजगती Swara- निषादः
Mantra with Swara
कृ॒ष्णग्री॑वाऽआग्ने॒या ब॒भ्रवः॑ सौ॒म्याऽउ॑पध्व॒स्ताः सा॑वि॒त्रा वत्सत॒र्यः सारस्व॒त्यः श्या॒माः पौ॒ष्णाः पृश्न॑यो मारु॒ता ब॑हुरू॒पा वै॑श्वदे॒वा व॒शा द्या॑वापृथि॒वीयाः॑॥१४॥

कृ॒ष्णग्री॑वा॒ इति॑ कृ॒ष्णऽग्री॑वाः। आ॒ग्ने॒याः। ब॒भ्रवः॑। सौ॒म्याः। उ॒प॒ध्व॒स्ताऽइत्यु॑पऽध्व॒स्ताः। सा॒वि॒त्राः। व॒त्स॒त॒र्यः᳖। सा॒र॒स्व॒त्यः᳖। श्या॒माः। पौ॒ष्णाः। पृश्न॑यः। मा॒रु॒ताः। ब॒हु॒रू॒पा इति॑ बहुऽरू॒पाः। वै॒श्व॒दे॒वा इति॑ वैश्वदे॒वाः। व॒शाः। द्या॒वा॒पृ॒थि॒वीयाः॑ ॥४ ॥

Mantra without Swara
कृष्णग्रीवाऽआग्नेया बभ्रवः सौम्याऽउपध्वस्ताः सावित्रा वत्सतर्यः सारस्वत्यः श्यामाः पौष्णाः पृश्नयो मारुता बहुरूपा वैश्वदेवा वशा द्यावापृथिवीयाः ॥

कृष्णग्रीवा इति कृष्णऽग्रीवाः। आग्नेयाः। बभ्रवः। सौम्याः। उपध्वस्ताऽइत्युपऽध्वस्ताः। सावित्राः। वत्सतर्यः। सारस्वत्यः। श्यामाः। पौष्णाः। पृश्नयः। मारुताः। बहुरूपा इति बहुऽरूपाः। वैश्वदेवा इति वैश्वदेवाः। वशाः। द्यावापृथिवीयाः॥४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, हे जाणून घ्या की ज्या (कृष्णग्रीवा) पशूंच्या गळ्याचा रंग काळा आहे, ते (आग्नेयाः) अग्निदेवतामय आहेत. जे (बभ्रवः) सर्वांच्या धारण, जीवन, पोषणाचे कारण आहेत (गाय, बैल आदी) ते पशू (सौम्याः) सौम देवतामय असून जे (उपध्वस्ताः) वरून म्हणजे उभ्या अवस्थेपासून साली म्हणजे थकलेले असल्यामुळे खाली भूमीवर बसलेले आहे, त्या पशूंना (सावित्राः) सवितादेवतामय जाणा. जे (वत्सतर्यः) असे पशू आहेत की ज्यांची लहान वासरें आहेत, अशा माता गायीना (सारस्वत्यः) वाणीदेवतामय जाणा. जे (श्यामाः) काळ्यां रंगाचे आहेत, त्यांना (पौष्णाः) पुष्टिकारक मेघदेवतामय आणि जे (पृश्‍नयः) विचारण्यास पात्र (म्हणजे हे पशु कुठले? कोणत्या जाति प्रजातीचे? असे ज्यांच्या विषयी विचारावे लागते,) ते पशू (मारुताः) मनुष्य देवतामय जाणा. जे पशू (बहुरूपाः) अनेक रूप धारण करणारे (स्वभाव आणि अवस्ताभेदाने वेगवेगळे रूप घेतात) ते (वैश्‍वदेवाः) समस्त विद्वानदेवतामय आणि जे (वशाः) निरंतर सतत चमकणारे वा दीप्तिमान आहेत, त्या पशूंना (द्यावापृथिवीयाः) आकाश आणि पृथ्वी या देवताद्यांशी (त्यांच्या मुणविशिष्टाशी) संबंधित जाणा ॥14॥
Essence
भावार्थ - ज्या प्रमाणे शिल्पविद्या जाणणारे (तंत्रज्ञ, अभियंता आदी) विद्वान अग्नी आदी पदार्थांद्वारा विविध कार्यें सिद्ध करून घेतात, तसे कृषकजनांनी पशूंपासून कृषि, वाहनादी विविध कामें पूर्ण करावीत ॥14॥
Subject
पुन्हा त्याच विषयी -