Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 24 / Mantra 11

40 Mantra
24/11
Devata- वसन्तादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- स्वराड बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
धू॒म्रान् व॑स॒न्तायाल॑भते श्वे॒तान् ग्री॒ष्माय॑ कृ॒ष्णान् व॒र्षाभ्यो॑ऽरु॒णाञ्छ॒रदे॒ पृष॑तो हेम॒न्ताय॑ पि॒शङ्गा॒ञ्छिशि॑राय॥११॥

धू॒म्रान्। व॒स॒न्ताय॑। आ। ल॒भ॒ते॒। श्वे॒तान्। ग्री॒ष्माय॑। कृ॒ष्णान्। व॒र्षाभ्यः॑। अ॒रु॒णान्। श॒रदे॑। पृष॑तः। हे॒म॒न्ताय॑। पिशङ्गा॑न्। शिशि॑राय ॥११ ॥

Mantra without Swara
धूम्रान्वसन्तायालभते श्वेतान्ग्रीष्माय कृष्णान्वर्षाभ्योरुणाञ्छरदे पृषतो हेमन्ताय पिशङ्गाञ्छिशिराय ॥

धूम्रान्। वसन्ताय। आ। लभते। श्वेतान्। ग्रीष्माय। कृष्णान्। वर्षाभ्यः। अरुणान्। शरदे। पृषतः। हेमन्ताय। पिशङ्गान्। शिशिराय॥११॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - जो माणूस (वसन्ताय) वसंत ऋतूत आनंदप्राप्तीसाठी (धूम्रान्) धुरकट रंगाच्या पदार्थांचा उपयोग करतो, तो सुखी होतो. जो (ग्रीष्माय) ग्रीष्मऋतूत सुखप्राप्त्यर्थ (श्‍वेतान्) श्‍वेत पदार्थांचा आणि (वर्षाभ्यः) वर्षाऋतूत कार्य सिद्धीकरिता (कृष्णान्) काळ्या रंगाच्या पदार्थांचा अथवा कृषीकार्यात उपयोगी (नांगर) फाळ, कुळवणी आदी) साधनांचा हेतु प्राप्त वापर करतो, तो सुखी होतो. जो माणूस (शरदे) शरद ऋतूमधे आनंद प्राप्तर्थ्य (अरूणान्) लाल रंगाच्या पदार्थांचा आणि जो (हेमन्ताय हेमंत ऋतूत (पृषतः) जाडजूड (कंवल कांबळी, वस्त्रादींचा उपयोग त्या ऋतूसाठी आवश्यक कार्यें पूर्ण करण्यासाठी (पिशङ्गान्) किंचित लाल रंगाच्या पदार्थांचा उपयोग करतो, तो निरंतर सुखी व आनंदी राहतो. ॥11॥
Essence
भावार्थ - ज्या ज्या ऋतूत ज्या ज्या पदार्थांचा संचय आणि उपयोग लाभदायी आहे, मनुष्याने ते ते पदार्थ प्राप्त करावेत, संचित करावेत आणि त्यांच्या सेवनामुळे निरोग राहून धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष यांची प्राप्ती होईल, असे आचरण ठेवावे. ॥11॥
Subject
पुनश्‍च, त्यांच विषयी -