Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 24 / Mantra 10

40 Mantra
24/10
Devata- अन्तरिक्षादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- स्वराड् गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
कृ॒ष्णा भाै॒मा धू॒म्राऽआ॑न्तरि॒क्षा बृ॒हन्तो॑ दि॒व्याः श॒बला॑ वैद्यु॒ताः सि॒ध्मास्ता॑र॒काः॥१०॥

कृ॒ष्णाः। भौ॒माः। धू॒म्राः। आ॒न्त॒रि॒क्षाः। बृ॒हन्तः॑। दि॒व्याः। श॒बलाः॑। वै॒द्यु॒ताः। सि॒ध्माः। ता॒र॒काः ॥१० ॥

Mantra without Swara
कृष्णा भौमा धूम्रा आन्तरिक्षा बृहन्तो दिव्याः शबला वैद्युताः सिध्मास्तारकाः ॥

कृष्णाः। भौमाः। धूम्राः। आन्तरिक्षाः। बृहन्तः। दिव्याः। शबलाः। वैद्युताः। सिध्माः। तारकाः॥१०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, हे जाणा की जे (कृष्णाः) काळ्या रंगाचे अथवा शेतात नांगरणे आदी कामें करतात, ते पशू (भौमाः) भूमीदेवतामय आहेत जे (धूम्राः) धुरकट रंगाचे आहेत, ते (आन्तरिक्षाः) अंतरिक्षदेवतामय (आकाशाचा रंग धुरासारखा महणून ) तसे जाणावेत. जे (दिव्याः) दिव्य गुण कर्म आणि स्वभावाचे (बृहन्तः) वाढणार्‍या वयाचे वा पूर्ण वयाचे (शबलाः) थोड्या पांढर्‍या रंगाचे आहेत.ते पशू (वा बैल) (वैद्युताः) विद्युतदेवतामय आणि जे (सिध्माः) मंगलकारी आहेत, ते (तारकाः) दुःखापासून दूर करणारे वा तारणारे आहेत, असे जाणावे. ॥10॥
Essence
भावार्थ - जर माणसांनी सांगरणे वाहन ओढणें आदी कामांची साधनें असलेले (बैल, अश्‍व) आदी प्राण्यांचा भूमीशी, शेतीशी संबंधित कार्यांमधे उपयोग केला, तर ती माणसें आनंद व कल्याण प्राप्त करणारे होतात. ॥10॥
Subject
पुनश्‍च, तोच विषय -