Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 7

65 Mantra
23/7
Devata- इन्द्रो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृद्बृहती Swara- मध्यमः
Mantra with Swara
यद्वातो॑ऽअ॒पोऽअग॑नीगन्प्रि॒यामिन्द्र॑स्य त॒न्वम्। ए॒तस्तो॑तर॒नेन॑ प॒था पुन॒रश्व॒माव॑र्त्तयासि नः॥७॥

यत्। वातः॑। अ॒पः। अग॑नीगन्। प्रि॒याम्। इन्द्र॑स्य। त॒न्व᳖म्। ए॒तम्। स्तो॒तः॒। अ॒नेन॑। प॒था। पुनः॑। अश्व॑म्। आ। व॒र्त्त॒या॒सि॒। नः॒ ॥७ ॥

Mantra without Swara
यद्वातोऽअपोऽअगनीगन्प्रियामिन्द्रस्य तन्वम् । एतँ स्तोतरनेन पथा पुनरश्वमा वर्तयासि नः ॥

यत्। वातः। अपः। अगनीगन्। प्रियाम्। इन्द्रस्य। तन्वम्। एतम्। स्तोतः। अनेन। पथा। पुनः। अश्वम्। आ। वर्त्तयासि। नः॥७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (स्तोतः) स्तुती करण्यास योग्य विद्वान, ज्याप्रमाणे, शिल्पी वा कारीगर लोक (इन्द्रस्थ) विजेच्या (प्रियाम्) अतिप्रिय वा अत्युपयोगी (तन्वम्) विस्तारशील शरीराला (विजेच्या दूरगामी प्रवाहाला) (वातः) वायूप्रमाणे दूरगामी असलेला पाहून(यद्) जे कलायंत्र (वा मशीन, इंजिन) रूप घोड्याला आणि (अपः) पाण्याला (अगनीगन) प्राप्त करतात (यंत्राच्या सहाय्याने पाण्यातून विजेची निर्मिती करतात त्या त्याप्रमाणे (एवम्) या (अश्‍वम्) शीघ्रगामी कलायंत्ररूप घोड्याला (मोटार आदी वाहनाला) (अनेन) त्या विद्युतेच्या (पक्ष) मार्गाने साह्याने प्राप्त करून (पुनः) नंतर (नः) आपण आम्हा सर्वजनांसाठी (आ, वर्त्तयामसि) चांगल्या प्रकारे त्या विजेला वापरता, इकडून तिकडून घेऊन जाता. त्यामुळे आम्ही (नागरिकजणांनी) आपला सत्कार केला पाहिजे. ॥7॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यांनो, जे (वैज्ञानिक, अभियंता वा तांत्रिक ज्ञानी) लोक तुम्हाला चांगल्या सुख- सोयीच्या मार्गावर नेतात, (तुमच्यासाठी जीवनाच्या सुख-सोयींची व्यवस्था करतात) त्यांच्या संगतीत राहून तुम्हीदेखील वायु आणि विद्युतशक्तीची विद्या शिकून घ्या ॥7॥
Subject
माणसाने कोणाचा संग करावा या विषयी.-