Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 64

65 Mantra
23/64
Devata- ईश्वरो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- विराडुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
होता॑ यक्षत् प्र॒जाप॑ति॒ꣳ सोम॑स्य महि॒म्नः।जु॒षतां॒ पिब॑तु॒ सोम॒ꣳ होत॒र्यज॑॥६४॥

होता॑। य॒क्ष॒त्। प्र॒जाप॑ति॒मिति॑ प्र॒जाऽप॑तिम्। सोम॑स्य। म॒हि॒म्नः। जु॒षता॑म्। पिब॑तु। सोम॑म्। होतः॑। यज॑ ॥६४ ॥

Mantra without Swara
होता यक्षत्प्रजापतिँ सोमस्य महिम्नः । जुषताम्पिबतु सोमँ होतर्यज ॥

होता। यक्षत्। प्रजापतिमिति प्रजाऽपतिम्। सोमस्य। महिम्नः। जुषताम्। पिबतु। सोमम्। होतः। यज॥६४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (होतः) (धन, विद्या वा प्रेरणा) देणार्‍या दाता मनुष्या, (होता) दान स्वीकारणारा माणूस ज्याप्रमाणे (सोमस्य) सर्वैश्‍वर्यमय (महिम्नः) आणि आपल्या महिमेमुळे महान (प्रजापतिम्) विश्‍वपालक जगदीश्‍वराची (यक्षत्) पूजा, उपासना करतो आणि (जुषताम्) (दान घेणार्‍याला) सेवेद्वारे प्रसन्न करतो, आणि (सोमम्) सर्व उत्तम औषधीचा रस (पिबतु) पितो वा प्यावा, तद्वत हे दाता, तू देखील (यज) त्या परमेश्‍वराची पूजा कर आणि उत्तम औषधींचा रस पीत जा ॥64॥
Essence
भावार्थ -या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. हे मनुष्यांनो ज्या प्रमाणे या जगातील परमेश्‍वराने केलेली अद्भुत सृष्टी पाहून त्या रचयिता ईश्‍वराचा महिमा जाणतात आणि त्याची उपासना करतात तद्वत तुम्हीही करीत जा. जसे हे विद्वान लोक योग्य रीतीने पथ्य पालन करीत उचित औषधी सेवन करून नीरोगी होतात, तसे तुम्हीही नीरोगी व्हा. ॥64॥
Subject
ईश्‍वराची उपासना कशी करावी, याविषयी.-