Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 63

65 Mantra
23/63
Devata- समाधाता देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
सु॒भूः स्व॑य॒म्भूः प्र॑थ॒मोऽन्तर्म॑हत्यर्ण॒वे।द॒धे ह॒ गर्भ॑मृ॒त्वियं॒ यतो॑ जा॒तः प्र॒जाप॑तिः॥६३॥

सु॒भूरिति॑ सु॒ऽभूः। स्व॒य॒म्भूरिति॑ स्व॒य॒म्ऽभूः। प्र॒थ॒मः। अ॒न्तः। म॒ह॒ति। अ॒र्ण॒वे। द॒धे। ह॒। गर्भ॑म्। ऋ॒त्विय॑म्। यतः॑। जा॒तः। प्र॒जाप॑ति॒रिति॑ प्र॒जाऽप॑तिः ॥६३ ॥

Mantra without Swara
सुभूः स्वयम्भूः प्रथमो न्तर्महत्यर्णवे । दधे ह गर्भमृत्वियँयतो जातः प्रजापतिः ॥

सुभूरिति सुऽभूः। स्वयम्भूरिति स्वयम्ऽभूः। प्रथमः। अन्तः। महति। अर्णवे। दधे। ह। गर्भम्। ऋत्वियम्। यतः। जातः। प्रजापतिरिति प्रजाऽपतिः॥६३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
हे जिज्ञासू मनुष्या, ऐक (यतः) ज्या जगदीश्‍वरापासून (प्रजापतिः) विश्‍वाचा रक्षणकर्मा सूर्य (जातः) उत्पन्न ज्या जगदीश्‍वरापासून (प्रजापतिः) विश्‍वाचा रक्षणकर्ता सूर्य (जातः) उत्पन्न झाला आहे आणि जो (सुभूः) अत्यंत मनोहर आणि अस्तिृत्वान आहे तसेच जो (स्वयम्भूः) स्वतः प्रसिद्ध उत्पत्ती - नाश रहित अजन्मा, अमर असून (प्रथमः) सर्वप्रथम विद्यमान जगदीश्‍वर आहे, (त्याचीच सर्वांनी उपासना करावी.) तसेच जो (महति) अति विशाल (अर्णवे) जलाचा समूह वा जलाचे स्थान हा संसार आहे, त्या (अन्तः) जगामधे (ऋत्वियम्) समआनुकूल प्राप्त (गर्भम्) बी (दधे) धारण करतो (जलामुळे वनस्पती आदीचे बी उगवण्याची वृक्षवृद्धीची व्यवस्था करतो) (ह) निश्‍चयाने आम्ही सर्व लोकांनी त्याच परमेश्‍वराची उपासना केली पाहिजे. ॥63॥
Essence
भावार्थ - मनुष्यांनी सूर्यादि लोकांचे जे उत्तम कारण म्हणजे प्रकृती, त्या प्रकृतीमधे ज्या परमेश्‍वराने उत्पन्न उत्पत्ति (बी, वनस्पती वा इतर पदार्थ) उत्पन्न करण्याची शक्ती दिली आहे. त्या परमेश्‍वराला आणि त्याच्या अनंत सामर्थ्याला जे लोक जाणतील ते अवश्य पुष्कळ सुख प्राप्त करतील ॥63॥
Subject
ईश्‍वर कसा आहे, याविषयी -