Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 62

65 Mantra
23/62
Devata- समाधाता देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- विराडनुष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
इ॒यं वेदिः॒ परो॒ऽअन्तः॑ पृथि॒व्याऽअ॒यं य॒ज्ञो भुव॑नस्य॒ नाभिः॑।अ॒यꣳ सोमो॒ वृष्णो॒ऽअश्व॑स्य॒ रेतो॑ ब्र॒ह्मायं वा॒चः प॑र॒मं व्यो॑म॥६२॥

इ॒यम्। वेदिः॑। परः॑। अन्तः॑। पृ॒थि॒व्याः। अ॒यम्। य॒ज्ञः। भुव॑नस्य। नाभिः॑। अ॒यम्। सोमः॑। वृष्णः॑। अश्व॑स्य। रेतः॑। ब्र॒ह्मा। अ॒यम्। वा॒चः। प॒र॒मम्। व्यो॒मेति॒ विऽओ॑म ॥६२ ॥

Mantra without Swara
इयँवेदिः परोऽअन्तः पृथिव्याऽअयँयज्ञो यत्र भुवनस्य नाभिः । अयँ सोमो वृष्णोऽअश्वस्य रेतः ब्रह्मायँवाचः परमँव्योम ॥

इयम्। वेदिः। परः। अन्तः। पृथिव्याः। अयम्। यज्ञः। भुवनस्य। नाभिः। अयम्। सोमः। वृष्णः। अश्वस्य। रेतः। ब्रह्मा। अयम्। वाचः। परमम्। व्योमेति विऽओम॥६२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जिज्ञासू मनुष्या, तुझ्या प्रश्नाचे उत्तर ऐक (1) (इमम्) ही (वेदिः) मध्यरेखा (पृथिव्याः) भूमीच्या (परः) परभागाची (अन्तः) सीमा आहे (2) (अयम्) हा प्रत्यक्ष गुणवान (यज्ञः) सर्वांना पूज्य असा परमेश्‍वर (भुवनस्य) जगाच्या (नाभिः) नियंत्रित स्थिती वा गतीचे बंधन आहे. (3) (अयम्) हा (सोमः) औषधीमधे उत्तम अशी अंशुमान आदी सोम (वृष्णः) पराक्रमकर्ता (राजा वा सेनाध्यक्षा सारखा) (अश्‍वस्य) बलवान मनुष्याच्या (रेतः) पराक्रम आहे (या औषधीच्या सेवनामुळे तो वीर अधिक बलवान होतो) आणि (4) (अयम्) हा (ब्रह्म) चार वेदांचा ज्ञाता (वाचः) तीन वेदरूप वाणीचा (परमम्) उत्तम (व्योम) स्थान आहे. (वेदज्ञ पंडिताची वाणी सर्वोत्कृष्ट आहे). तुझ्या प्रश्‍नांची ही अशी उत्तरें आहेत ॥62॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, या भूगोलावर जर एक मध्यरेखा ओढली, तर ती वरून भूमीच्या अंतापर्यंत जाते. ती गणितातील व्यासरेखेप्रमाणे असल्यामुळे त्या रेषेलाच भूमीची सीमा समजावी. सर्व पृथ्वी, चंद्र, ग्रह- नक्षत्रादीच्या मधे आकर्षण कर्ता तो जगदीश्‍वरच आहे. सर्व प्राण्यांना पराक्रमवृत्ती देणार्‍या औषधीमधे अंशुमान आदी सोम औषध हे सर्वोत्तम आहे. आणि वेदपारंगत, वेदज्ञ, विद्वान, हाच वाणीच्या पलीकडे जाऊ शकतो (वाणीच्या पूर्ण सामर्थ्याला जाणते) ॥62॥
Subject
पूर्वीच्या प्रश्‍न क्र. 61 मधील प्रश्‍नांची उत्तरें -