Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 60

65 Mantra
23/60
Devata- समाधाता देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
वेदा॒हम॒स्य भुव॑नस्य॒ नाभिं॒ वेद॒ द्यावा॑पृथि॒वीऽअ॒न्तरि॑क्षम्।वेद॒ सूर्य॑स्य बृह॒तो ज॒नित्र॒मथो॑ वेद च॒न्द्रम॑सं यतो॒जाः॥६०॥

वेद॑। अ॒हम्। अ॒स्य। भुव॑नस्य। नाभि॑म्। वेद॑। द्यावा॑पृथि॒वी इति॑ द्यावा॑पृथि॒वी। अ॒न्तरि॑क्षम्। वेद॑। सूर्य॑स्य। बृ॒ह॒तः। ज॒नित्र॑म्। अथो॒ इत्यथो॑। वे॒द॒। च॒न्द्रम॑सम्। य॒तो॒जा इति॑ य॒तःऽजाः ॥६० ॥

Mantra without Swara
वेदाहमस्य भुवनस्य नाभिँवेद द्यावापृथिवीऽअन्तरिक्षम् । वेद सूर्यस्य बृहतो जनित्रमथो वेद चन्द्रमसँयतोजाः ॥

वेद। अहम्। अस्य। भुवनस्य। नाभिम्। वेद। द्यावापृथिवी इति द्यावापृथिवी। अन्तरिक्षम्। वेद। सूर्यस्य। बृहतः। जनित्रम्। अथो इत्यथो। वेद। चन्द्रमसम्। यतोजा इति यतःऽजाः॥६०॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जिज्ञासू मनुष्या, (1) (अस्य) या (भुवनस्य) सर्वांचा आधार असलेल्या जगाचा जे (नाभिम्) बंधनाचे स्थान असून कारणरूप व मध्यभाग आहे तो परब्रह्म (परमात्मसामर्थ्यामुळेच सर्व वस्तू, पृथ्वी, ग्रहादी आकर्षण शक्तीच्या प्रभावाने एका सुसूत्र नियमित कक्षेत गती व संचार करतात) त्या परब्रह्मरूप मध्यभागाला (अहम्) मी तुझा उपदेशक (वेद) जाणतो अथवा तो परब्रह्मच सर्वाधार व मध्यभाग आहे, हे मला ज्ञात आहे. तसेच (द्यावापृथिवी) स्व प्रकाशमान आणि परतः प्रकाशमान अशा लोक-लोकांतरांच्या आणि (अन्तरिक्षम्) आकाशाला मी (वेद) ओळखतो. (3) बृहतः) विशाल (सूय्यस्य) सूर्य लोकाचा तो (जनिश्रम्) उपादान, वै जस कारण आणि निनित्त कारण आहे, अशा रूपात ब्रह्माला (वेद) मी ओळखतो. (अथो) यानंतर (यतोजाः) ज्या परमेश्‍वरापासून चंद्र उत्पन्न झाला, त्या परमात्म्याला व (चन्द्रमसम्) चंद्राला (वेद) मी जाणतो (अर्थात जगाचा आधार आकर्षण व आपापल्या कक्षेत संचालित करणारा केवळ तो एक परब्रह्म आहे, हे तुझ्या सर्व प्रश्‍नांचे एकच उत्तर आहे) ॥60॥
Essence
भावार्थ - विद्वानांने उत्तर द्यावे की हे जिज्ञासू मनुष्या, या जगाच्या बंधनाचे वा स्थितीचे कारण, प्रकाशमान वा अप्रकाशमान ग्रहादी, आकाश, तीन लोकांचे कारण सूर्य व चंद्रमाचे उपादान व निमित्त कारण ब्रह्माला मी जाणतो. तोच सर्वांचे निमित्त आणि प्रकृती उपादन कारण आहे. ॥60॥
Subject
मागील मंत्रातील प्रश्‍नांची उत्तरें मंत्रात -