Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 6

65 Mantra
23/6
Devata- सूर्यो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- विराडगायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
यु॒ञ्जन्त्य॑स्य॒ काम्या॒ हरी॒ विप॑क्षसा॒ रथे॑। शोणा॑ धृ॒ष्णू नृ॒वाह॑सा॥६॥

यु॒ञ्जन्ति॑। अ॒स्य॒। काम्या॑। हरी॒ऽइति॒ हरी॑। विप॑क्ष॒सेति॒ विऽप॑क्षसा। रथे॑। शोणा॑। धृ॒ष्णूऽइति॑ धृ॒ष्णू। नृ॒वाह॒सेति॑ नृ॒ऽवाह॑सा ॥६ ॥

Mantra without Swara
युञ्जन्त्यस्य काम्या हरी विपक्षसा रथे । शोणा धृष्णू नृसाहसा ॥

युञ्जन्ति। अस्य। काम्या। हरीऽइति हरी। विपक्षसेति विऽपक्षसा। रथे। शोणा। धृष्णूऽइति धृष्णू। नृवाहसेति नृऽवाहसा॥६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे (घोडे, बैल आदी पशूंना) प्रशिक्षण देणारे घोडेस्वार वा प्रशिक्षक (काम्या) अत्यंत सुंदर आणि (हरी) वाहून वा ओढून नेणार्‍या (विपक्षसा) विविधप्रकारे (लगाम वा टाच) द्वारे नियंत्रित केलेल्या (शोणा) लाल रंगाच्या (धृष्णू) अती पृष्ट आणि (नृवाहसा) मनुष्यांना एका स्थानापासून दुसर्‍या स्थानापर्यंत नेणार्‍या दोन घोड्यांना (रथे) रथात (युञ्जन्ती) जुंपतात, त्याप्रमाणे योगीजन (अस्य) या परमेश्‍वराशी आपली इंद्रियें, अंतःकरण आणि प्राण, यांना संयुक्त करतात (इंद्रियें, अंतःकरण आणि प्राण यांना ईश्‍वरापाशी जोडण्यामुळेच ईशप्राप्ती संभव आहे, असा आशय आहे) ॥6॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जसे चांगल्याप्रकारे प्रशिक्षित घोड्यांनी युक्त रथाद्वारे एका स्थानापासून दुसर्‍या स्थानापर्यंत लवकर जातात, तसे लोक वा उपासक गण विद्याध्ययन, सत्संग आणि योगाभ्यासाद्वारे परमेश्‍वराला शीघ्र प्राप्त करतात ॥6॥
Subject
आता ईश्‍वराची प्राप्ती कोणत्या उपायांनी होईल, याविषयी.-