Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 58

65 Mantra
23/58
Devata- समिधा देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृत त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
षड॑स्य वि॒ष्ठाः श॒तम॒क्षरा॑ण्यशी॒तिर्होमाः॑ स॒मिधो॑ ह ति॒स्रः।य॒ज्ञस्य॑ ते वि॒दथा॒ प्र ब्र॑वीमि स॒प्त होता॑रऽऋतु॒शो य॑जन्ति॥५८॥

षट्। अ॒स्य॒। वि॒ष्ठाः। वि॒स्था इति॑ वि॒ऽस्थाः। श॒तम्। अ॒क्षरा॑णि। अ॒शी॒तिः। होमाः॑। स॒मिध॒ इति॑ स॒म्ऽइधः॑। ह॒। ति॒स्रः। य॒ज्ञस्य॑। ते॒ वि॒दथा॑। प्र। ब्र॒वी॒मि॒। स॒प्त। होता॑रः। ऋ॒तु॒श इति॑ ऋतु॒ऽशः। य॒ज॒न्ति॒ ॥५८ ॥

Mantra without Swara
षडस्य विष्ठाः शतमक्षराण्यशीतिर्हामाः समिधो ह तिस्रः । यज्ञस्य ते विदथा प्रब्रवीमि सप्त होतारऽऋतुशो यजन्ति ॥

षट्। अस्य। विष्ठाः। विस्था इति विऽस्थाः। शतम्। अक्षराणि। अशीतिः। होमाः। समिध इति सम्ऽइधः। ह। तिस्रः। यज्ञस्य। ते विदथा। प्र। ब्रवीमि। सप्त। होतारः। ऋतुश इति ऋतुऽशः। यजन्ति॥५८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जिज्ञासू जनहो, उत्तरें ऐका. (अस्य) संसाररूप (यज्ञस्य) संगतीकृत वा निर्मित सृष्टीचे आधार आहेत (षट्) सहा ऋतू, या जगाच्या (विष्ठाः) विशेष स्थितीचे आधार (शतम्) शेकडो आहेत. (अक्षराणि) उत्पत्तिची वा जीवनाची साधनें म्हणजे जल वायू आदी (अशीतिः) अगणित आहेत. (होमाः) या जगात आदान-प्रदान करण्यायोग्य अशा वस्तू आणि (तिसः) आध्यात्मिक, आधिदैविक आधिभौतिक (ह) प्रसिद्ध (समिधः) ज्ञानादीची प्रकाशक विद्या आहेत. (सप्त) तसेच. पाच प्राण, मन आणि आत्मा अशा सात आहेत. (होतारः) देण्या घेण्याचे व्यवहार करणारे लोक (ऋतुश:) वसंत आदी ऋतू मधे (यजन्ति) एकत्रित होतात. त्या जगाचे (विदथा) विज्ञान मी (आचार्य वा उपदेशक) (त्वा) तुला (शिष्याला वा जिज्ञासूजनाला) (प्रब्रवीमि) सांगत आहे. ॥58॥
Essence
भावार्थ - हे ज्ञानार्थी जनहो, जगतरूप यज्ञात सहा ऋतू असून जल आदी अगणित पदार्थ या सृष्टीच्या अस्तित्वासाठी वा धारणासाठी आवश्यक आहेत. अनेक पदार्थामुळे या जगाची वा लोकांची कामें होतात. त्यामुळेच सर्व प्राणी व अप्राणी संगतीत वा एकमेकास उपयोगी होतात. ज्या यज्ञात ज्ञान आदीचा प्रकाश करणार्‍या तीन प्रकारच्या विद्या आहेत, तुम्ही त्या यज्ञाचे पूर्ण ज्ञान वा त्याचे महत्व जाणून घ्या ॥58॥
Subject
पूर्वीच्या मंत्रातील प्रश्‍नांची उत्तरे या मंत्रात दिली आहेत -