Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 54

65 Mantra
23/54
Devata- समाधाता देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
द्यौरा॑सीत् पू॒र्वचि॑त्ति॒रश्व॑ऽआसीद् बृ॒हद्वयः॑।अवि॑रासीत् पिलिप्पि॒ला रात्रि॑रासीत् पिशङ्गि॒ला॥५४॥

द्यौः। आ॒सी॒त्। पू॒र्वचि॑त्ति॒रिति॑ पू॒र्वऽचि॑त्तिः। अश्वः॑। आ॒सी॒त्। बृ॒हत्। वयः॑। अविः॑। आ॒सी॒त्। पि॒लि॒प्पि॒ला। रात्रिः॑। आ॒सी॒त्। पि॒श॒ङ्गि॒ला ॥५४ ॥

Mantra without Swara
द्यौरासीत्पूर्वचित्तिरऽअश्वऽआसीद्बृहद्वयः । अविरासीत्पिलिप्पिला रात्रिरासीत्पिशङ्गिला ॥

द्यौः। आसीत्। पूर्वचित्तिरिति पूर्वऽचित्तिः। अश्वः। आसीत्। बृहत्। वयः। अविः। आसीत्। पिलिप्पिला। रात्रिः। आसीत्। पिशङ्गिला॥५४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे ज्ञिनासू मनुष्या, तुझ्या प्रश्‍नांची उत्तरें जाणून घे. (1) (द्यौः) विद्युत (पूर्वचित्तिः) प्रथमसंचित वस्तू (आसीत्) आहे. (विद्युत वा ऊर्जा संचित करून ठेवता येते) (2) (अश्‍वः) महत्त्व (बृअत्) महान (वयः) उत्पत्तिस्वरूप (आसीत्) आहे. (महत्तत्त्वामुळे सृष्टीची उत्पत्ती क्रमशः होत गेली आहे) (3) (.अविः) रक्षण करणारी प्रकृती (पिलिप्पिला) लिबलिबित व चिक्कण पदार्थामुळे निर्मिती संभवते) आणि (4) (रात्रिः) रात्रीप्रमाणे असलेला प्रलय (पिशङ्गिला) सर्व अवयवांना (वा जगातील उत्पन्न पदार्थांना) गिळणारा (आसीत्) आहे. ॥54॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, जी अतिसूक्ष्म विद्युत आहे, ते प्रथम, महत्तत्त्वरूप द्वितीय परिणाम आणि प्रकृती ही सर्वांचे मूळ कारण आहे. ती परिणाम रहित, वा नित्य अविनाशी आहे आणि प्रलय हा या स्थूल जगाचा विनाश आहे, हे तुम्ही सर्व जण जाणून घ्या ॥54॥
Subject
पूर्वीच्या क्र. 52 वरील मंत्रातील प्रश्‍नांची उत्तरे या मंत्रात -