Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 5

65 Mantra
23/5
Devata- परमेश्वरो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
यु॒ञ्जन्ति॑ ब्र॒ध्नम॑रु॒षं चर॑न्तं॒ परि॑ त॒स्थुषः॑। रोच॑न्तेरोच॒ना दि॒वि॥५॥

यु॒ञ्जन्ति॑। ब्र॒ध्नम्। अ॒रु॒षम्। चर॑न्तरम्। परि॑। त॒स्थुषः॑। रोच॑न्ते। रो॒च॒नाः। दि॒वि ॥५ ॥

Mantra without Swara
युञ्जन्ति ब्रध्नमरुषञ्चरन्तम्परि तस्थुषः । रोचन्ते रोचना दिवि ॥

युञ्जन्ति। ब्रध्नम्। अरुषम्। चरन्तरम्। परि। तस्थुषः। रोचन्ते। रोचनाः। दिवि॥५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (परि) सर्वतः सर्वप्रकारें (तस्थुषः) स्थावर जीवांमधे (वृक्षादीमधे) (चरन्तम्) व्याप्त असलेल्या विद्युतप्रमाणे जो संचलित आहे तसेच (अरूषक) प्राण्यांच्या मर्मस्थानांच्या, की ज्या ठिकाणी पीडा व आघात झाल्यामुळे प्राणी प्राणास मुकतात, त्या मर्मस्थानांच्या रक्षणासाठी जो परमेश्‍वर स्थिर आहे (मर्मस्थळे आणि शरीराच्या अंग-प्रत्यंगांमधे तो संचरित असून त्या (ब्रध्नम) सर्वश्रेष्ठ सर्वोपरि परमेश्‍वराला जे लोक आपल्या आत्म्याशी (युञ्जन्ति) जोडतात, ते लोक (दिवी) सूर्याच्या (रोचनाः) किरणांप्रमाणे (रोचन्ते) परमात्म्यात प्रकाशमान होतात (हृदयप्रदेशात ईश्‍वराच्या साक्षात्कार करतात) ॥5॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, ज्याप्रमाणे प्रत्येक ब्रह्मांण्डात सूर्य प्रकाशमान आहे, तसा परमेश्‍वर सर्व जगामधे प्रकाशमान आहे (सर्वव्यापी आहे) जे लोक योगाभ्यासाद्वारे त्या अंतर्यामी परमेश्‍वराला आपल्या आत्म्याशी संयुक्त करतात, ते सर्वथा प्रकाश (ज्ञान, प्रेरणा, बुद्धी, शक्ती आदी) प्राप्त करतात, हे निःसंशय ॥5॥
Subject
ईश्‍वरा कसा आहे, याविषयी .-