Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 48

65 Mantra
23/48
Devata- ब्रह्मादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ब्रह्म॒ सूर्य॑समं॒ ज्योति॒र्द्यौः स॑मु॒द्रस॑म॒ꣳसरः॑।इन्द्रः॑ पृथि॒व्यै वर्षी॑या॒न् गोस्तु मात्रा॒ न वि॑द्यते॥४८॥

ब्रह्म॑। सूर्य्य॑सम॒मिति॒ सूर्य्य॑ऽसमम्। ज्योतिः॑। द्यौः। स॒मु॒द्रस॑म॒मिति॑ समु॒द्रऽस॑मम्। सरः॑। इन्द्रः॑। पृ॒थि॒व्यै। वर्षी॑यान्। गोः। तु। मात्रा॑। न। वि॒द्य॒ते॒ ॥४८ ॥

Mantra without Swara
ब्रह्म सूर्यसमञ्ज्योतिर्द्याः समुद्रसमँ सरः । इन्द्रः पृथिव्यै वर्षीयान्गोस्तु मात्रा न विद्यते ॥

ब्रह्म। सूर्य्यसममिति सूर्य्यऽसमम्। ज्योतिः। द्यौः। समुद्रसममिति समुद्रऽसमम्। सरः। इन्द्रः। पृथिव्यै। वर्षीयान्। गोः। तु। मात्रा। न। विद्यते॥४८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे ज्ञानार्थी पुरूषा, (तुझ्या प्रश्‍नांचे उत्तर ऐक) (सूर्य्यसमम्) सूर्याप्रमाणे (ज्योतिः) स्वप्रकाशस्वरूप, स्वतः प्रकाशमान (ब्रह्म) तो सर्वांहून महान अनंत असा परमेश्‍वर आहे. (समुद्रसमम्) समुद्रासम आहे (सरः) तलाव वा मोठा सरोवर आहे (द्योः) अर्थात अंतरिक्ष (पृथिव्यै) (वर्षीयान्) पृथ्वीहून विशाल व मोठा आहे (इन्द्रः) सूर्य आणि (गोः) वाणीचा (तु) तर (मात्रा) माप, तोल वा परिणाम (न) (विद्यते) नाही. (सूर्याच्या शक्ती व ऊर्जा किती, याला कोणी मोजू शकत नाही. तसेच वाणीमधे जो अपरिमित प्रभाव आहे, त्याला कोणत्या मापदंडाने मोजता येईल?) अर्थीत ते अशक्य आहे, हे तुम्ही ज्ञानार्थी जन नीट समजून घ्या ॥48॥
Essence
भावार्थ - ब्रह्म जो स्वतः प्रकाशमान आहे, त्यासम जगात कोणतीही ज्योती नाही. तसेच सूर्याच्या प्रकाशाने मेघ मंडळात जाऊन स्थिर होणारे विशालतम जलाशय दुसरा कोणता असेल अथवा सूर्यमंडलासारखा लोकेश कोण असेल आणि वाणीप्रमाणे आपली कार्ये सुरळीतपणे सिद्ध करणारे साधन दुसरे कोणतेही नाही, हे सर्व जणांनी जाणून घ्यावे ॥48॥
Subject
मागील मंत्रातील प्रश्‍नांची उत्तरें या मंत्रात दिली आहेत -