Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 46

65 Mantra
23/46
Devata- सूर्यादयो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
सूर्य्य॑ऽएका॒की च॑रति च॒न्द्रमा॑ जायते॒ पुनः॑।अ॒ग्निर्हि॒मस्य॑ भेष॒जं भूमि॑रा॒वप॑नं म॒हत्॥४६॥

सूर्य्यः॑। ए॒का॒की। च॒र॒ति॒। च॒न्द्रमाः॑। जा॒य॒ते॒। पुन॒रिति॒ऽपुनः॑। अ॒ग्निः। हि॒मस्य॑। भे॒ष॒जम्। भूमिः॑। आ॒वप॑न॒मित्या॒ऽवप॑नम्। म॒हत्॥४६ ॥

Mantra without Swara
सूर्यऽएकाकी चरति चन्द्रमा जायते पुनः । अग्निर्धिमस्य भेषजम्भूमिरावपनम्महत् ॥

सूर्य्यः। एकाकी। चरति। चन्द्रमाः। जायते। पुनरितिऽपुनः। अग्निः। हिमस्य। भेषजम्। भूमिः। आवपनमित्याऽवपनम्। महत्॥४६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे जिज्ञासू विद्यार्थी, (प्रश्‍नांची उत्तरें ऐक) (सूर्य्यः) सूर्य (एकाकी) एकटाच (चरति) (स्वसामर्थ्याने आणि कोणाच्या सहाय्याशिवाय) संचार करतो. (चन्द्रमाः) आनंददायक चंद्र (पुनः) वारंवार (रात्री) (जायते) जन्मतो म्हणजे उगवतो व प्रकाश देतो (अग्निः) आग (हिमस्य) थंडीवर प्रभावी (भेषजम्) औषध आहे आणि जगातील (महत्) सर्वात मोठा (आवपनम्) बी पेरण्या व उगवण्याचा आधार आहे (भूमिः) भूमी. ॥46॥
Essence
भावार्थ - हे विद्वानहो, हे जाणून घ्या की सूर्य आपल्या परिधीत फिरत असतो, कोणत्या लोकांतराच्या भोवती फिरत नाही. चन्द्रादी लोक त्या सूर्याच्या प्रकाशाने प्रकाशित होतात. अग्नी हाच थंडीचा निवारक असून सर्व प्रकारचे बी पेरण्याचे मुख्य क्षेत्र ही भूमी आहे. ॥46॥
Subject
पूर्वीच्या (क्र. 45 वरच्या) मंत्रातील प्रश्‍नांची उत्तरे, या विषयी -
Footnote
(टीप - हा मंत्रदेखील मागे याच अध्यायात क्र. 10 वर आला आहे. येथे त्याची पुनरावृत्ती झाली आहे.)