Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 42

65 Mantra
23/42
Devata- अध्यापको देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- भुरिगुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
दैव्या॑ऽअध्व॒र्यव॒स्त्वाच्छ्य॑न्तु॒ वि च॑ शासतु।गात्रा॑णि पर्व॒शस्ते॒ सिमाः॑ कृण्वन्तु॒ शम्य॑न्तीः॥४२॥

दैव्याः॑। अ॒ध्व॒र्यवः॑। त्वा॒। आ। छ्य॒न्तु॒। वि। च॒। शा॒स॒तु॒। गात्रा॑णि। प॒र्व॒श इति॑ पर्व॒ऽशः। ते। सिमाः॑। कृ॒ण्व॒न्तु॒। शम्य॑न्तीः ॥४२ ॥

Mantra without Swara
दैव्याऽअध्वर्यवस्त्वाच्छ्यन्तु वि च आसतु । गात्राणि पर्वशस्ते सिमाः कृण्वन्तु शम्यन्तीः॥

दैव्याः। अध्वर्यवः। त्वा। आ। छ्यन्तु। वि। च। शासतु। गात्राणि। पर्वश इति पर्वऽशः। ते। सिमाः। कृण्वन्तु। शम्यन्तीः॥४२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्यार्थी वा हे विद्यार्थिनी, (दैव्यः) विद्वानांतील अतिकुशल (अध्वर्यवः) आणि आपली व तुझी रक्षा करणे रूप यज्ञाची (स्वयंरक्षण आणि इतरांचे रक्षण) इच्छा बाळगणारे अध्यापक आणि उपदेशकजनांनी (त्वा) तुम्हाला (वि, शासतु) विशेष उपदेश नेहमी द्यावा. (च) आणि (ते) तुमच्या दोषांचा (आ, छ्यन्तु) विनाश करावा. तसेच (पर्वशः) शरीरातील प्रत्येक संधिस्थळाला तसेच (गात्राणि) अवयवांना त्या विद्वानांनी परीक्षा करावी (अवयवांत व संधिस्थळांत वातादी दोष असू नयेत, याकडे लक्ष द्यावे) या शिवाय समाजातील (सिमाः) प्रेम करणार्‍या माता व सत् नारीगण (शम्यन्तीः) तुमच्यातील दुष्प्रवृत्ती दूर करीत तुम्हाला योग्य ते वळण (कृण्वन्तु) देत राहो ॥42॥
Essence
भावार्थ - अध्यापक, उपदेशक आणि अतिथी लोक जेव्हां बालकांना शिक्षण देतात, त्यावेळी त्यांच्यातील काम, क्रोधादी दोषांचा विनाशही अवश्य करावा. त्यांच उत्तम विद्या शिकवावी. शिक्षण घेणार्‍या मुलींकडेही उपदेशक व अध्यापकांनी अशीच वृत्ती ठेवावी. याशिवाय मुला-मुलींच्या शरीरातील अंग-अवयवांचे वैद्यकीय दृष्ट्या तपासणी करवीत रहावे व जरूर असल्यास औषध-योजना करावी ॥42॥
Subject
अध्यापकगण कसे असावेत, याविषयी -