Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 39

65 Mantra
23/39
Devata- अध्यापको देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- भुरिग्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
कस्त्वाछ्य॑ति॒ कस्त्वा॒ विशा॑स्ति॒ कस्ते॒ गात्रा॑णि शम्यति।कऽउ॑ ते शमि॒ता क॒विः॥३९॥

कः। त्वा॒। आछ्य॑ति। कः। त्वा॒। वि। शा॒स्ति॒। कः। ते॒। गात्रा॑णि। श॒म्य॒ति॒। कः। उँ॒ऽइत्यूँ॑। ते॒। श॒मि॒ता। क॒विः ॥३९ ॥

Mantra without Swara
कस्त्वाच्छ्यति कस्त्वा विशास्ति कस्ते गात्राणि शम्यति । कऽउ ते शमिता कविः॥

कः। त्वा। आछ्यति। कः। त्वा। वि। शास्ति। कः। ते। गात्राणि। शम्यति। कः। उँऽइत्यूँ। ते। शमिता। कविः॥३९॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे अध्ययन करणार्‍या (शिक्षण घेणार्‍या विद्यार्थी) सांग की (त्वा) तुला (कः) कोण (आछ्यति ) छेदन करतो (ताडन वा दंडित करतो?) (कः) कोण (त्वा) तुला (विशास्ति) चांगले शिकवितो? (कः) कोण (ते) तुझ्या (गात्राणि) अंगांना (नेत्र, कर्ण, हात-पाय आदींनां (शाम्यति) शांती देतो? (औषधीद्वारे वा योगादी विद्या शिकवून तुला शारीरिक आनंद देतो?) आणि (कः) कोण (उ) तो आहे की जो (ते) तुला (शमिता) ?? करणे व (कविः) समस्त शास्त्र समजावून शिकविणारा आहे? तू या प्रश्‍नांची उत्तरे दे ॥39॥
Essence
भावार्थ - अध्यापकांनी विदयार्थ्यांना परीक्षेत असे प्रश्‍न विचारावेत की कोण लोक आहेत की तुम्हाला ?? म्हणजे अध्ययनकार्यात विघ्नें आणतात, कोण तुम्हाला वाचण्यासाठी शिकण्यासाठी उपदेश वा प्रेरणा देतात? कोण आहेत की जे तुम्हाला शरीरावयवांची स्वच्छता. तसेच काम करण्याच्या योग्य पद्धती सांगतात. तसेच कोण अध्यापक आहे की जो तुम्ही काय वाचले व काय अधिक शिकले पाहिजे, हे सांगतात. अशा प्रकारे अध्यापकांनी विद्यार्थ्यांना प्रश्‍न विचारून त्यांची परीक्षा घेतली पाहिजे. उत्तम विद्यार्थ्यांना प्रोत्साहन दिले पाहिजे आणि दुष्ट प्रवृत्तीच्या विद्यार्थ्यांना अपमानित वा दंडित करावे व आाप्रकारे विद्येची उन्नती केली पाहिजे. ॥39॥
Subject
अध्यापकांनी विद्यार्थ्यांची परीक्षा कशा पद्धतीने घ्यावी, या विषयी -