Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 38

65 Mantra
23/38
Devata- सभासदो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृत् त्रिष्टुप् Swara- धैवतः
Mantra with Swara
कु॒विद॒ङ्ग यव॑मन्तो॒ यव॑ञ्चि॒द्यथा॒ दान्त्य॑नुपू॒र्वं वि॒यूय॑।इ॒हेहै॑षां कृणुहि॒ भोज॑नानि॒ ये ब॒र्हिषो॒ नम॑ऽउक्तिं॒ यज॑न्ति॥३८॥

कु॒वित्। अ॒ङ्ग। यव॑मन्त इति॒ यव॑ऽमन्तः। यव॑म्। चि॒त्। यथा॑। दान्ति॑। अ॒नु॒पू॒र्वमित्य॑नुऽपू॒र्वम्। वि॒यूयेति॑ वि॒ऽयूय॑। इ॒हेहेती॒हऽइ॑ह। ए॒षा॒म्। कृ॒णु॒हि॒। भोज॑नानि। ये। ब॒र्हिषः॑। नम॑ऽउक्ति॒मिति॒ नमः॑ऽउक्तिम्। यज॑न्ति ॥३८ ॥

Mantra without Swara
कुविदङ्ग यवमन्तो वयञ्चिद्यथा दान्त्यनुपूर्वँवियूय । इहेहैषाङ्कृणुहि भोजनानि ये बर्हिषो नमऽउक्तिँयजन्ति ॥

कुवित्। अङ्ग। यवमन्त इति यवऽमन्तः। यवम्। चित्। यथा। दान्ति। अनुपूर्वमित्यनुऽपूर्वम्। वियूयेति विऽयूय। इहेहेतीहऽइह। एषाम्। कृणुहि। भोजनानि। ये। बर्हिषः। नमऽउक्तिमिति नमःऽउक्तिम्। यजन्ति॥३८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (अङ्ग) मित्रा, तू (कुवित्) अत्यंत ज्ञानि-विज्ञान आहेस. तू (इहेह) या जगातील विविध कार्य व्यवहारांमधे (एषाम) या इतर लोकाशी (कशा प्रकारे सुविचारपूर्वक कार्यें करतोस?) अशाप्रकारे की (तथा) जसे कृषकगण (यवमन्तः) जव आदी धान्याची शेती करणारे कृषक (यवम्) यव आदी धान्याच्या कणांना भुश्यापासून (वियूय) हालवून वा ओग्नावून वेगळे करतात (चित्) आणि (अनुपूर्वम्) क्रमाक्रमाने (यान्ति) त्या भुसा व धान्य यांना तोडणे निवडणे आदी कामें करतात. (हे विद्यार्थी, वा अध्यापक, तूम्ही अज्ञानापासून ज्ञान वेगळे करतोस आणि सत्य तेच सांभाळून ठेवतोस) (ये) जे लोक (बर्हिषः) जल अथवा (नमउक्तिम्) अन्न-धान्यादीद्वारे (यजन्ति) नम्रवचनाने तुमचा सत्कार-सम्मान करतात, तुम्ही दोघे त्यांच्या (भोजनानि) भोजनाचा निमंत्रणाचा, (कृणुहि) स्वीकार करा. ॥38॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. हे अध्यापक आणि हे अध्ययन कर्ता जनहो, ज्याप्रमाणे शेतकरी एकमेकाच्या शेतातील कापणी, नांगरणी आदी कामें मिळून व आळीपाळीने करतात तसेच भुश्यापासून धान्यकण वेगळे करतात आणि आधी इतरांना जेवण घालून नंतर स्वतः जेवतात, तद्वत तुम्ही या अध्ययन-अध्यापन कार्यात निष्कपट होऊन (एकमेकाला सहकार्य द्यावे) ते असे की विद्यार्थ्यांनी अध्यापकांची सेवा करावी आणि अध्यापकांनी विद्यार्थ्यांचे ज्ञान वाढवावे याशिवाय दोघांनी खान-पान आदी विषयी एकमेकाला सत्कृत वा आनंदित करीत रहावे. ॥38॥
Subject
अध्ययन करणारे व अध्यापन करणारे कसे असावेत, याविषयी -