Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 37

65 Mantra
23/37
Devata- स्त्रियो देवताः Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
र॒ज॒ता हरि॑णीः॒ सीसा॒ युजो॑ युज्यन्ते॒ कर्म॑भिः।अश्व॑स्य वा॒जिन॑स्त्व॒चि सिमाः॑ शम्यन्तु॒ शम्य॑न्तीः॥३७॥

र॒ज॒ताः। हरि॑णीः। सीसाः॑। युजः॑। यु॒ज्य॒न्ते॒। कर्म॑भिरिति॒ कर्म॑ऽभिः। अश्व॑स्य। वा॒जिनः॑। त्व॒चि। सिमाः॑। श॒म्य॒न्तु॒। शम्य॑न्तीः ॥३७ ॥

Mantra without Swara
रजता हरिणीः सीसा युजो युज्यन्ते कर्मभिः । अश्वस्य वाजिनस्त्वचि सिमाः शम्यन्तु शम्यन्तीः ॥

रजताः। हरिणीः। सीसाः। युजः। युज्यन्ते। कर्मभिरिति कर्मऽभिः। अश्वस्य। वाजिनः। त्वचि। सिमाः। शप्यन्तु। शम्यन्तीः॥३७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ – स्वयंवर पद्धतीने विवाहित स्त्रिया (वाजिनः) प्रसिद्ध शक्तिमान आणि (अश्‍वस्थ) उत्तम गुणवान आपल्या पतीची (त्वचि) (किर्ती आणि ऐश्‍वर्य) अजून वाढविण्यासाठी (पुज्यन्ते) त्याच्याशी संयुक्त राहतात म्हणजे त्याला वस्त्रादी आंथरणे-पांघरणे आदी सेवेत व्यस्त राहतात. त्या स्त्रियांप्रमाणेच (कर्मभिः) धर्मयुक्त कार्य करीत (रजताः) पतीशी अनुरक्त आणि त्याला प्रिय अशा (हरिणीः) प्रेमाने स्विकारलेल्या त्या (सीसाः) प्रेमळ स्वभावाच्या (युजः) सावध राहून कामें करणार्‍या स्त्रिया (पत्नी) (शम्यन्तीः) स्वतः शांत संतुलित राहत इतरांनाही शांत करील (सिमाः) प्रेमसूत्राने पतीशी बद्धत्या स्त्रिया प्रेमपूर्वक (शम्यन्तु) आनंदाचा उपयोग करीत वा करतात ॥37॥
Essence
भावार्थ - हे मनुष्यांनो, विद्या आणि सुसंस्कार प्राप्त स्त्री-पुरूष स्वतःच्या इच्छेने प्रेमाने एकमेकास पति-पत्नी म्हणून स्वीकारतात, त्या लावण्यमय म्हणजे अतिसुंदर, गुणवान व सुस्ववभावी अशा संतानाला जन्म देऊन सदा आनंदात राहतात. ॥37॥
Subject
त्या कन्या कशा असाव्यात वा होतील, याविषयी -