Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 35

65 Mantra
23/35
Devata- प्रजा देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- भुरिगुष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
म॒हाना॑म्न्यो रे॒वत्यो॒ विश्वा॒ आशाः॑ प्र॒भूव॑रीः।मैघी॑र्वि॒द्युतो॒ वाचः॑ सू॒चीभिः॑ शम्यन्तु त्वा॥३५॥

म॒हाना॑म्न्य॒ इति॑ म॒हाऽना॑म्न्यः। रे॒वत्यः॑। विश्वाः॑। आशाः॑। प्र॒भूव॒रीरिति॑ प्र॒ऽभूव॑रीः। मैघीः॑। वि॒द्युत॒ इति॑ वि॒द्युऽतः॑। वाचः॑। सू॒चीभिः॑। श॒म्य॒न्तु॒। त्वा॒ ॥३५ ॥

Mantra without Swara
महानाम्न्यो रेवत्यो विश्वाऽआशाः प्रभूवरीः । मैघीर्विद्युतो वाचः सूचीभिः शम्यन्तु त्वा ॥

महानाम्न्य इति महाऽनाम्न्यः। रेवत्यः। विश्वाः। आशाः। प्रभूवरीरिति प्रऽभूवरीः। मैघीः। विद्युत इति विद्युऽतः। वाचः। सूचीभिः। शम्यन्तु। त्वा॥३५॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे ज्ञानार्थी जन, जे विद्वान तुला (संतुष्ट करू शकतात, तु त्यांच्याजवळ जा) ते विद्वान (सूचीभिः) संधीचे नियम या जोडण्याच्या पद्धती जाणतात. ते (महानाम्न्यः) मोठ्या प्रसिद्ध (रेवत्यः) आणि अनेकविध धन असलेल्या (प्रभूवरीः) तसेच स्वामित्व असलेल्या (विश्‍वा) समस्त (आशाः) दिशांप्रमाणे आहेत. (विद्ववानांकडे ज्ञानरूप धन आहे, ते छंदशास्त्राचे स्वामी आहेत) तसेच (मैघीः) ढगांमधे चमकणार्‍या (विद्युतः) विद्युतेप्रमाणे त्या विद्वानांची (वाचः) वाणी आहे (त्यांची वारी बुद्धित प्रकाश पाडणारी आहे) ते विद्वान (त्वा) तुला (शम्यन्तु) शांत, संतुष्ट करतील. (तुझ्या सर्व शंकांचे ते निवारण करतील, तु त्यांच्याजवळ जा) ॥35॥
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा आहे ज्या विद्वानांची वाणी दिशांप्रमाणे सर्व विद्यांमधे प्रसृत आहे (ते बहुविद्या वान् आहेत) आणि मेघामधे विद्यमान विद्युतेप्रमाणे मंत्राच्या अर्थाचा अकस्मात प्रकाश करणारी आहे, ते विद्वान जितेंद्रिय होऊन महान कीर्तिमंत होतात. ॥35॥
Subject
विद्वान कसे असावेत, याविषयी -