Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 33

65 Mantra
23/33
Devata- विद्वांसो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- उष्णिक् Swara- ऋषभः
Mantra with Swara
गा॒य॒त्री त्रि॒ष्टुब्जग॑त्यनु॒ष्टुप्प॒ङ्क्त्या स॒ह।बृ॒ह॒त्युष्णिहा॑ क॒कुप्सू॒चीभिः॑ शम्यन्तु त्वा॥३३॥

गा॒य॒त्री। त्रि॒ष्टुप्। त्रि॒स्तुबिति॑ त्रि॒ऽस्तुप्। जग॑ती। अ॒नु॒ष्टुप्। अ॒नु॒स्तुबित्य॑नु॒ऽस्तुप्। प॒ङ्क्त्या। स॒ह। बृ॒ह॒ती। उ॒ष्णिहा॑। क॒कुप्। सू॒चीभिः॑। श॒म्य॒न्तु॒। त्वा॒ ॥३३ ॥

Mantra without Swara
गायत्री त्रिष्टुब्जगत्यनुष्टुप्पङ्क्त्या सह । बृहत्युष्णिहा ककुप्सूचीभिः शम्यन्तु त्वा ॥

गायत्री। त्रिष्टुप्। त्रिस्तुबिति त्रिऽस्तुप्। जगती। अनुष्टुप्। अनुस्तुबित्यनुऽस्तुप्। पङ्क्त्या। सह। बृहती। उष्णिहा। ककुप्। सूचीभिः। शम्यन्तु। त्वा॥३३॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे विद्वान (वा जिज्ञासू विद्यार्थी), जे प्रकांड वैदिक विद्वान (पंङ्क्तया) विशाल अशा पंक्ति नाम छंदा (सह) सह आणि (गायत्री) गाणार्‍याची रक्षण करणारी तसेच (त्रिष्युप्) आध्यात्मिक, आधिभौतिक आणि आधिदैविक या तीन दुःखांना पोषवणार्‍या त्रिष्टुप् नामक छंद (शिकवून तुला विद्वान व शांत स्वभाव करतात) तू त्या विद्वानांजवळ जा) तसेच जे वेदपंडित तुला (जगती) जगाप्रमाणे विस्तृत असा जगती छंद शिकवतील वा शिकवतात, तसेच जे तुला (अनुष्टुप्) जे मागे येणार्‍या दुखांना वा बाधांना ऐकून धरतात त्या अनुष्टुप छंदाचे आणि (उष्णिहा) प्रातःच्या वेळेला पाठ करण्यासाठी उपयुक्त अशा उष्णिक् (छंदाचे ज्ञान देतील, तू त्यांच्या जवळ जा) तसेच जे विद्वान (बृहती) गंभीर अर्थ असणारे बृहती छंद, आणि (ककुप्) ललित पदांचे अर्थ सामावून घेणारा कुकुप् छंद तुला शिकवितील (तू त्या विद्वांजवळ जा) ज्याप्रमाणेच ते विद्वान विविध छंद आणि त्या छंदातील मंत्र शिकवून (त्वा) तुला (शम्यन्त) शांत वा संतुष्ट करतील. अथवा तुला सर्व विद्या शिकवून विद्यावान करतील, तू त्या विद्वानांचे सेवन कर. (त्यांच्याजवळ राहत जा) ॥33॥
Essence
भावार्थ - जे विद्वान गायत्री आदी छंदातील मंत्राचा अर्थ सांगून सर्व मनुष्यांना विद्वान करतात, ते जगाचा कल्याण करणारे असतात. ज्याप्रमाणे फाटलेले कापड सुईच्या साहाय्याने शिवतात, तद्वत जे विद्वान विभिन्न मतावलेली लोकांना त्यातील मतभेद दूर सारून सर्वांना एका मतात आणतात, त्यात एकमत करतात, ते जगाचे कल्याणकारी होतात. ॥33॥
Subject
पुनश्‍च, त्याचविषयी -