Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 32

65 Mantra
23/32
Devata- राजा देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
द॒धि॒क्राव्णो॑ऽअकारिषं जि॒ष्णोरश्व॑स्य वा॒जिनः॑।सु॒र॒भि नो॒ मुखा॑ कर॒त्प्र ण॒ऽआयू॑षि तारिषत्॥३२॥

द॒धि॒क्राव्ण॒ इति दधि॒ऽक्राव्णः॑। अ॒का॒रि॒ष॒म्। जि॒ष्णोः। अश्व॑स्य। वा॒जिनः॑। सु॒र॒भि। नः॒। मुखा॑। क॒र॒त्। प्र। नः॒। आयू॑ꣳषि। ता॒रि॒ष॒त्॥३२ ॥

Mantra without Swara
दधिक्राव्णोऽअकारिषञ्जिष्णोरश्वस्य वाजिनः । सुरभि नो मुखा करत्प्र ण आयूँषि तारिषत् ॥

दधिक्राव्ण इति दधिऽक्राव्णः। अकारिषम्। जिष्णोः। अश्वस्य। वाजिनः। सुरभि। नः। मुखा। करत्। प्र। नः। आयूꣳषि। तारिषत्॥३२॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे राजा, मी (एक सैनिक वा राजपुरूष) (दधिक्राव्णः) (प्रजेचे) धारण-पोषण करणार्‍या (वैश्‍वादी दानी) जनांपर्यंत (वाजिनः) अत्यंत वेगवान आणि (जिष्णोः) विजयी ठरणार्‍या (अश्‍वस्य) शीघ्रगामी घोड्याप्रमाणे (अकारिषम्) त्वरित जातो व पराक्रम करून दाखवितो. आपणही (नः) आम्ही (सैनिकांनी वा राजपुरूषांनी) (सुरभि) सुगंधित (मुखा) मुखाप्रमाणे सुंदर व प्रिय पराक्रम करून दाखविल्यानंतर (प्र,करत्) आपणही तसा पराक्रम करा आणि (नः) आमच्या (आयूंषि) आयुष्याला (तारिषत्) आयुष्याच्या सीमेपर्यंत पोहचला (आम्हांला दीर्घजीवी करा) ॥32॥
Essence
भावार्थ - ज्याप्रमाणे घोड्यांना प्रशिक्षण देणारे प्रशिक्षक युद्धात पराक्रम करून दाखविण्याच्या दृष्टीने घोड्यांना बलवान नियमबद्ध आणि युद्दात विजयी ठरणारे करतात, त्याप्रमाणे अध्यापक व उपदेशकगणांनी अध्ययनकारी कुमार-कुमारींना ब्रह्मचर्याचे पालन करवावे आणि त्याना पंडित वा पंडिता करावे. त्यांना शारिरीक व आत्मिक शक्ती प्राप्त करण्यासाठी प्रेरणाद्यावी, तसेच ते कशाप्रकारे दीर्घजीवी व युद्धनिपुण होतील, ते पहावे. ॥32॥
Subject
राजाने कोणत्या विषयाची (वस्तू वा गुणांची) वृद्धी करावी -