Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 31

65 Mantra
23/31
Devata- राजप्रजे देवते Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
यद्ध॑रि॒णो यव॒मत्ति॒ न पु॒ष्टं ब॒हु मन्य॑ते।शू॒द्रो यदर्या॑यै जा॒रो न पोष॒मनु॑ मन्यते॥३१॥

यत्। ह॒रि॒णः। यव॑म्। अत्ति॑। न। पु॒ष्टम्। ब॒हु॒। मन्य॑ते। शू॒द्रः। यत्। अर्य्या॑यै। जा॒रः। न। पोष॑म्। अनु॑। म॒न्य॒ते॒ ॥३१ ॥

Mantra without Swara
यद्धरिणो यवमत्ति न पुष्टम्बहु मन्यते । शूद्रो यदर्यायै जारो न पोषमनुमन्यते ॥

यत्। हरिणः। यवम्। अत्ति। न। पुष्टम्। बहु। मन्यते। शूद्रः। यत्। अर्य्यायै। जारः। न। पोषम्। अनु। मन्यते॥३१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (शूद्रः) मूर्खांच्या कुळात जन्म घेतलेला एखादा मूर्ख माणूस (यत्) जो (अर्य्यायै) आपल्या मालकाच्या अथवा वैश्य कुळातील एखाद्या स्त्रीशी (जारः) जारकर्म करतो आणि अशा व्यभिचाराने आपल्या आयुष्याचा नाश करीत असतो, तो कदापी (पोषम्) पुष्टी), उत्कर्ष वा उन्नती (न) (अनुमन्यते) प्राप्त करीत नाही. (त्याला तो अनाचार मानवत नाही) तसेच (हरिणः) एक हरण ज्याप्रमाणे (यवम्) उगवलेल्या जव आदी धान्य (अत्ति) दुसर्‍याच्या उभ्या शेतात घुसून पिकाचा नाश करतो) तद्वत (यत्) जो राजा (पुष्टम्) आपल्या प्रजेला धन, संतती, स्त्री आदी दृष्टीने समृद्ध वा पुष्ट करीत नाही (प्रजा अभाव दुःखादीने त्रस्त झालेली असूनही राजाला) (न) (बहु) (मन्यते) त्याचे काही वाटत नाही, असा बेफिकिर राजा सर्वदा क्षीण व नष्ट-भ्रष्ट होत जातो ॥31॥
Essence
भावार्थ - जे राजा आणि राजपुरूष परस्त्रीगमन वा वेश्यागमन करतात, अथवा पशू प्रमाणे अविवेकी कृत्ये करतात, त्या राज पुरूषांना विद्वान लोक शुद्रवत समजतात. जसा एक शूद्र मूर्ख माणूस एखाद्या श्रेष्ठ कुळात शिरून तो स्वतः व्यभिचारी असल्यामुळे श्रेष्ठकुळातही व्यभिचार करून वर्णसंवार निर्माण करतो, तसेच ब्राह्मण, क्षत्रिय आणि वैश्य, शूद्र कुळात व्याभिचार प्रसृत करून वर्णसंकर निर्माण करण्याचे निमित्त ठरतात आणि या मार्गामुळे सर्वच लोक विनाश पावतात. ॥31॥
Subject
राजा नष्ट होण्याची कारणे कोणती, याविषयी -