Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 28

65 Mantra
23/28
Devata- प्रजापतिर्देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
यद॑स्याऽअꣳहु॒भेद्याः॑ कृ॒धु स्थू॒लमु॒पात॑सत्। मु॒ष्काविद॑स्याऽएजतो गोश॒फे श॑कु॒लावि॑व॥२८॥

यत्। अ॒स्याः॒। अ॒ꣳहु॒भेद्या॒ऽइत्य॑ꣳहु॒ऽभेद्याः॑। कृ॒धु। स्थू॒लम्। उ॒पात॑स॒दित्यु॑प॒ऽअत॑सत्। मु॒ष्कौ। इत्। अ॒स्याः॒। ए॒ज॒तः॒। गो॒श॒फ इति॑ गोऽश॒फे। श॒कु॒लावि॒वेति॑ शकु॒लौऽइ॑व ॥२८ ॥

Mantra without Swara
यदस्याऽअँहुभेद्याः कृधु स्थूलमुपातसत् । मुष्काविदस्याऽएजतो गोशफे शकुलाविव ॥

यत्। अस्याः। अꣳहुभेद्याऽइत्यꣳहुऽभेद्याः। कृधु। स्थूलम्। उपातसदित्युपऽअतसत्। मुष्कौ। इत्। अस्याः। एजतः। गोशफ इति गोऽशफे। शकुलाविवेति शकुलौऽइव॥२८॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - (यत्) जो राजा अथवाल राजपुरूष (अस्याः) या (अंहुभेद्याः) अपराधाचा नाश करणार्‍या, (न्यायाने नियमाने वागणार्‍या) प्रजेच्या (कृधु) थोड्याशा अथवा (स्थूलम्) मोठ्या चांगल्या कामाची (उपातसत्) स्तुती करतील (तर प्रजा अधिक सुखी व नियमाने वागणारी होईल) तसेच (अस्याः) या प्रजेकडून जे राजपुरूष योग्य ती कामे करून घेतात, ते स्वतः (कोणते गैरकृत्य करतांना घाबरतात) (गोशफे) गायीच्या खुरामुळे भूमीत झालेल्या गढ्यामधे भरलेल्या पाण्यात जशा (शकुलाविव) दोन लहान मासोळी व्यथित होतात, तद्वत ते राजपुरूष (मुष्कौ) मूषक जसा धान्य चोरतो, तसे ते राजपुरूष प्रजेकडून प्राप्त कराची चोरी करताना कापतात/घाबरतात. ॥28॥
Essence
भावार्थ - या मंत्रात उपमा अलंकार आहे. ज्याप्रमाणे एकमेकाशी प्रेम करणार्‍या, एकमेकीच्या जिवाची काळजी घेणार्‍या दोन मासोळ्या छोट्याशा डबक्यात देखील प्रेमाने राहतात, तसे राजाने वा राजपुरूषांनी प्रजेकडून वसूल केलेल्या कराच्या धनाच्या सर्व लाभकारी न्याय कार्यात वापर केला पाहिजे तसेच जर राजपुरूष न्यायाने वागणार्‍या प्रजेच्या लहान-मोठ्या कार्याची प्रशंसा करतील, तर राजपुरूष आणि प्रजा दोघेही प्रसन्न व सुखाने प्रेमपूर्वक राहतील ॥28॥
Subject
पुनश्‍च तोच विषय -