Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 27

65 Mantra
23/27
Devata- श्रीर्देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ऊ॒र्ध्वमे॑न॒मुच्छ्र॑यताद् गि॒रौ भा॒रꣳ हर॑न्निव। अथा॑स्य॒ मध्य॑मेजतु शी॒ते वाते॑ पु॒नन्नि॑व॥२७॥

ऊ॒र्ध्वम्। ए॒न॒म्। उत्। श्र॒य॒ता॒त्। गि॒रौ। भा॒रम्। हर॑न्नि॒वेति॒ हर॑न्ऽइव। अथ॑। अ॒स्य॒। मध्य॑म्। ए॒ज॒तु॒। शी॒ते। वात॑ पु॒नन्नि॒वेति॑ पु॒नन्ऽइ॑व ॥२७ ॥

Mantra without Swara
ऊर्ध्वमेनमुच्छ्रायताद्गिरौ भारँ हरन्निव । अथास्य मध्यमेजतु शीते वाते पुनन्निव ॥

ऊर्ध्वम्। एनम्। उत्। श्रयतात्। गिरौ। भारम्। हरन्निवेति हरन्ऽइव। अथ। अस्य। मध्यम्। एजतु। शीते। वात पुनन्निवेति पुनन्ऽइव॥२७॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे प्रजेतील एक महान सद्वान महोदय, जसा एक धमिक (गिरौ) पर्वतावर चढतांना (भारम् ) आपल्या पाठीवरील ओझ्याला आपल्यासोबत (हरन्निव) वाहून वर-वर नेत असतो, तद्वत आपण (एनम्) या राजाला (ऊध्वम्) सर्व राज्य व व्यवहारादी विषयांत (उच्छ्रयतात्) अधिकाधिक उन्नत करा. (अथ) त्यानंतर जसा एक शेतकरी (शीते) (वाते) हळू वाहणार्‍या हवे (पुनन्निव) धान्य ओसावतो आणि भुश्यापासून शुद्ध स्वच्छ धान्य वेगळे काढतो, तद्वत (अस्य) हे राजा, आपण (अस्थ) या राजाच्या (मध्यम्) मध्यभागातील धनसंपदेतून (शुद्ध व न्याय, योग्य तेवढे धन कर रूपाने घेऊन) त्या धनाचा (एजतु) (राष्ट्रोन्नतीच्या कार्यासाठी) उपयोग करावा ते धन वाढवा अशाप्रकारे नेहमी उत्तम कर्में करीत रहा ॥27॥
Essence
भावार्थ - या मंत्रात दोन उपमा अलंकार आहेत. ज्याप्रमाणे सूर्य भूमीवरील पाणीचे ओझे वर मेघमंडळापर्यंत नेतो आणि तेथून वृष्टीच्या रूपाने ते पाणी परत करून सर्वांची उन्नती घडवितो, तसे प्रजाजनांनी राजपुरूषांना सहकार्य द्यावे आणि अधर्माचरणाला नेहमी भ्यावे. (प्रजेने राज्यनियमांप्रमाणे वागावे. भ्रष्टाचार, दुराचार करू नये) ॥27॥
Subject
पुनः तोच विषय.-