Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 26

65 Mantra
23/26
Devata- श्रीर्देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- अनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
ऊ॒र्ध्वामे॑ना॒मुच्छ्रा॑पय गि॒रौ भा॒रꣳ हर॑न्निव। अथा॑स्यै॒ मध्य॑मेधता शी॒ते वाते॑ पु॒नन्नि॑व॥२६॥

ऊ॒र्ध्वाम्। ए॒ना॒म्। उत्। श्रा॒प॒य॒। गि॒रौ। भा॒रम्। हर॑न्नि॒वेति॒ हर॑न्ऽइव। अथ॑। अ॒स्यै॒। मध्य॑म्। ए॒ध॒ता॒म्। शी॒ते। वाते॑ पु॒नन्नि॒वेति॑ पु॒नन्ऽइ॑व ॥२६ ॥

Mantra without Swara
ऊर्ध्वमेनामुच्छ्रापय गिरौ भारँ हरन्निव । अथास्य मध्यमेधताँ शीते वाते पुनन्निव ॥

ऊर्ध्वाम्। एनाम्। उत्। श्रापय। गिरौ। भारम्। हरन्निवेति हरन्ऽइव। अथ। अस्यै। मध्यम्। एधताम्। शीते। वाते पुनन्निवेति पुनन्ऽइव॥२६॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (राजन्) ज्याप्रमाणे एक श्रमिक (गिरौ) पर्वतावर चढताना (भारम्) पाठीवरील ओझ्याला (हरन्निव) वर-वर नेतो (त्याची उन्नती करतो) तद्वत (एनाम्) या राज्यलक्ष्मीयुक्त (धनसंपन्न वा शासनातील पदावर आरूढ असा) (ऊर्ध्वम्) उत्तम स्तरावरील प्रजाजनांना (उच्छ्रापय) नेहमी अधिकाधिक उत्कर्षाप्रत कन्या (अथ) त्यानंतर वा तसेच (अस्यै) या प्रजेच्या मध्यम (मध्यम वर्गाने) प्राप्त केलेल्या लक्ष्मी-धनसंपदेची (देखील वृद्धी करा) जसे (शीते) शीतल व हळू हळू वाहणार्‍या (वाते) हवेत (पुनन्निव) शेतकरी धान्य ओसावतात (त्या धान्याला वरून भूमीवर टाकून भूस व धान्य वेगळे करतात) तसे व हे राजन्, तुम्ही मध्यमवर्गातील संपन्न गृहस्थायीच्या संपदेचाही (एधताम्) वृद्धी वा उन्नती करा. ॥26॥
Essence
भावार्थ - या मंत्रात दोन उपमा अलंकार आहेत. जसा एक भारवाहक मजुर डोक्यावर वा पाठीवर ओझे उचलून ते ओझे वर नेऊन ठेवतो, त्याप्रमाणे राजाने धनाची उन्नती साधली पाहिजे. तसेच ज्याप्रमाणे शेतकरी धान्यातील भुसा वेगळा करून चांगल्या धान्याचे सेवन करून पुष्ट होतात, तद्वत राजाने सत्याने वागून असत्यापासून सत्य ते शोधावे आणि न्यायाने वागावे. असे वागणारा राजा नित्य उन्नती करीत जातो ॥26॥
Subject
राजपुरूषांनी कोणाची उन्नती करावी, या विषयी.-