Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 24

65 Mantra
23/24
Devata- भूमिसूर्यौ देवते Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- निचृदनुष्टुप् Swara- गान्धारः
Mantra with Swara
मा॒ता च॑ ते पि॒ता च॒ तेऽग्रं॑ वृ॒क्षस्य॑ रोहतः। प्रति॑ला॒मीति॑ ते पि॒ता ग॒भे मु॒ष्टिम॑तꣳसयत्॥२४॥

मा॒ता। च॒। ते॒। पि॒ता। च॒। ते॒। अग्र॑म्। वृ॒क्षस्य॑। रो॒ह॒तः॒। प्रति॑लामि। इति॑। ते॑। पि॒ता। ग॒भे। मु॒ष्टिम्। अ॒त॒ꣳस॒य॒त्॥२४ ॥

Mantra without Swara
माता च ते पिता च तेग्रँ वृक्षस्य रोहतः । प्रतिलामीति ते पिता गभे मुष्टिमतँसयत् ॥

माता। च। ते। पिता। च। ते। अग्रम्। वृक्षस्य। रोहतः। प्रतिलामि। इति। ते। पिता। गभे। मुष्टिम्। अतꣳसयत्॥२४॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे राजन्, जर (ते) तुमची (माता) भूमीप्रमाणे सहनशीलवृत्ती असलेली माता (च) आणि (ते) तुमचा (पिता) सूर्याप्रमाणे तेजस्वी असलेला निता (च) (तुमच्यासह हे दोघेही) (वृक्षस्य) छेदन करण्यास योग्य अशा या संसाररूप वृक्षाच्या वा राजाच्या (अग्रम्) मुख्य श्री व लक्ष्मीवर धनसंपदेवर) (रोहतः) आरूढ होतील, (तर राज्यावर केवढे उपकार होतील) तसेच जर तुमचा (पिता) पिता (गभे) प्रजेकडून (मुष्टिम्) मुठी-मुठीभर धन (वा कर वसूल करून) (अतंसयत्) अधिक उत्तम करील, तर मी (तुमचा) एक प्रजाजन (इति) अशाप्रकारे (प्र,तिलामि) त्या राजाला (तुमच्या पुत्राला) चांगले प्रशंसित करतो, त्यावर प्रीती करतो आणि माझ्या प्रमाणे सर्व प्रजाजनदेखील राजाला प्रिय मानतील)
Essence
भावार्थ - या मंत्रात वाचकलुप्तोपमा अलंकार आहे. जे (राजाचे) आईवडील पृथ्वी आणि सूर्याप्रमाणे राज्याला धैर्य आणि विद्या देऊन न्यायाने प्रजापालन करतील (आपल्या राजा असलेल्या पुत्राला सहाय्य मार्गदर्शन करतील) ते उत्तम लक्ष्मी प्राप्त करून प्रजेलाही प्रशंसित करतील आणि आपल्या पुत्राला राजकारणाचे धडे शिकवून त्यास राज्यशकट चालविण्यास समर्थ बनवतील ॥24॥
Subject
पुन्हा तोच विषय . -