Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

Yajurveda Adhyay 23 / Mantra 21

65 Mantra
23/21
Devata- न्यायधीशो देवता Rishi- प्रजापतिर्ऋषिः Chhand- भुरिग्गायत्री Swara- षड्जः
Mantra with Swara
उत्स॑क्थ्या॒ऽअव॑ गु॒दं धे॑हि॒ सम॒ञ्जिं चा॑रया वृषन्। य स्त्री॒णां जी॑व॒भोज॑नः॥२१॥

उत्स॑क्थ्या॒ इत्युत्ऽस॑क्थ्याः। अव॑। गु॒दम्। धे॒हि॒। सम्। अ॒ञ्जिम्। चा॒र॒य॒। वृ॒ष॒न्। यः। स्त्री॒णाम्। जी॒व॒भोज॑न॒ इति॑ जीव॒ऽभोज॑नः ॥२१ ॥

Mantra without Swara
उत्सक्थ्याऽअव गुदन्धेहि समञ्जिञ्चारया वृषन् । य स्त्रीणाञ्जीवभोजनः ॥

उत्सक्थ्या इत्युत्ऽसक्थ्याः। अव। गुदम्। धेहि। सम्। अञ्जिम्। चारय। वृषन्। यः। स्त्रीणाम्। जीवभोजन इति जीवऽभोजनः॥२१॥

Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar)

मराठी
Yajurveda Bhashya (Pt. Vedkumar Vedalankar) - मराठी
Meaning
शब्दार्थ - हे (वृषन्) शक्तिमान (राजा) (स्त्रीणाम्) स्त्रियांमधे (यः) जो प्राण्यांचे मांस खाणारा व व्यभिचारी पुरूष रहात वा वावरत असेल अथवा पुरूषांमधे जी कोणी मांसाहारिणी, व्यभिचारिणी स्त्री रहात वा वावरत असेल, तर अशा पुरूषाला व स्त्रीला कैद करून (उत्सक्थाः) त्याचे वा तिचे वर पाय आणि खाली डोके अशा अवस्थेत ठेवून राजाने दोषीला दंडित करावे. अशा पद्धती वा दंडामुळे राजाने आपल्या प्रजेपुढे (अव, गुदम) उत्तम आदर्श वा नियम रीती (धेहि) धारण करावी. (अशा कठोर शिक्षेमुळे इतर जनांना दहशत बसेल) अशाप्रकारे हे राजा, तुम्ही (अंजिम्) आपल्या न्यायव्यवस्था आणि शासन-व्यवस्थेला (संचारण) उत्तमपणे संचालित करा ॥21॥
Essence
भावार्थ - हे राजन्, राज्यामधे जे कोणी विषयासक्त पुरूष वा स्त्री असेल आणि समाजात व्यभिचार वृत्ती वाढवीत असेल, तर त्या पुरूषाला वा स्त्रीला राजाने कठोर शिक्षा केली पाहिजे ॥21॥
Subject
राजाने दुष्ट प्राण्यांना योग्यप्रकारे दंडित केले पाहिजे, याविषयी.-